पारनेर – पारनेर तालुक्यातील एकमेव महिला पत्रकार म्हणून पत्रकारिता क्षेत्रात काम असलेल्या दैनिक पारनेर समर्थ च्या कार्यकारी संपादक व दैनिक जनता आवाज च्या पारनेर तालुका प्रतिनिधी सौ . निलम खोसे पाटील यांना राज्य स्तरावर कार्य करणाऱ्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडिया समूहाच्या वतीने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय लोकराज्य मिडिया समूहाचे अध्यक्ष राहूल कुदनर यांनी दिली.
पत्रकारिता वा इतर कोणतेही क्षेत्र असो, यात महिलांचे प्रमाण अत्यल्प असते, प्रत्येक क्षेत्रावर पुरुषांची मक्तेदारी मोठ्या प्रमाणावर असते. महिलांना नेहमीच दुय्यम स्थान व वागणूक दिली जाते, पण याला अपवाद, पारनेर तालुका आहे. या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी वा इतर क्षेत्रात महिला दिसून येतात . तद्वतच पारनेर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात, ते ही दैनिक पारनेर समर्थ साठी कार्यकारी संपादक व दैनिक जनता आवाज या वृत्तपत्रांसाठी पारनेर तालुका प्रतिनिधी म्हणून आपल्या लेखनीतून समाजातील अडगळीत पडलेल्या समस्या प्रकाशात आणून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सौ. निलम खोसे पाटील यांच्या लेखनीची दखल घेत राज्य पातळीवर काम करणाऱ्या राष्ट्रीय लोकराज्य मिडिया समूहाच्या वतीने त्यांना ” राज्य स्तरीय आदर्श महिला पत्रकार ” हा मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्याचे सन्मानपूर्वक वितरण गुरुवार दि २६ रोजी रामनवमी या पवित्र दिनी राज्यातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे असे ही मिडिया समूहाचे अध्यक्ष राहूल कुदनर म्हणाले.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
पत्रकार सौ . निलम खोसे पाटील यांच्या या ” राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्कारा ” साठी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी ताई विखे पाटील, खा. निलेश लंके, आ. काशिनाथ दाते, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, जर्नालिस्ट असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष अजितराव मोरे व इतरांनी कौतूक करत अभिनंदन केले आहे.




