विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
कुरुंद | प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील कुरुंद गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांच्या विशेष प्रयत्नांतून तब्बल ३ कोटी १७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या विकासकामांमध्ये कुरुंद–भोसलेवाडी–नरवडेवाडी रस्त्यासाठी २ कोटी ६० लाख रुपये, संविधान सभागृहासाठी २५ लाख रुपये, स्मशानभूमी ते शिवाईमाता मंदिर रस्त्यासाठी २० लाख रुपये, तसेच हमालवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमुळे गावातील रस्ते, शैक्षणिक सुविधा आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकासाला हातभार लागणार आहे.
यावेळी बोलताना आमदार काशिनाथ दाते यांनी कुरुंद गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. गावाच्या गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास भाजप नेते विश्वनाथदादा कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, प्रशांत गायकवाड, राहुलदादा शिंदे, वसंतराव चेडे, सुष्माताई रावडे, आरपीआय चे तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, दत्तानाना पवार, सुभाषराव दुधाडे, मनोज मुंगसे, अजिंक्यतारा दरेकर, विकास पवार, जयसिंग कर्डिले, अनिल कर्डिले, दशरथदादा कुलाळ, निलेश खेमनर, अशोक शिंदे, संदीप राजगुरू, कारभारी गायकवाड, विठ्ठल चौधरी, आदिनाथ शेंडगे, गंगाराम गायकवाड, सचिन कर्डिले, मधुकर उबाळे, रामचंद्र गायकवाड, जिजिबा पडवळ, रविंद्र कर्डिले, बाळासाहेब उबाळे, भाऊसाहेब कर्डिले, बाबुराव भोसले, ॲड. वैभव चौधरी, राजेंद्र कर्डिले, सुदाम कर्डिले, मारुती जाधव, संजय गायकवाड, गौतम उबाळे, माऊली जाधव, सोमनाथ जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुरुंद गावातील विविध विकासकामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी मिळण्यास मदत होणार असून, या कामांमुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
“कुरुंद गावाच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी ३ कोटी १७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, ही गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. रस्ते, संविधान सभागृह, स्मशानभूमी रस्ता आणि शाळेच्या इमारतीसारख्या मूलभूत सुविधांची कामे मार्गी लागल्याने ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे. विकासकामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होईल. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच प्रकारे लोकप्रतिनिधींनी सातत्याने प्रयत्नशील राहावे, हीच अपेक्षा आहे.”
– राजेंद्र उबाळे, तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) :




