राष्ट्रवादीचे युवा नेते अमोल उगले यांचा उपक्रम

पारनेर/प्रतिनिधी : 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा १२ डिसेंबर रोजी ८५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले गेले याच पार्श्वभूमीवर, पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील माळवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम खा निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या तेजस्विनी अमोल उगले यांच्या संकल्पनेतून टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते अमोलभाऊ उगले यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. अमोलभाऊ उगले यांनी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसारखे शालेय साहित्य आणि खाऊचे पाकिटे वाटप करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, वडगाव सावताळ येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुदाम व्यवहारे साहेब, भाऊसाहेब मेहेर, काकणेवाडी ग्रामपंचायत सदस्य गोरखभाऊ वाळुंज, निलेश रांधवन तसेच शाळेचे मुख्याध्यापक संतोष खामकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शरद पवार साहेबांच्या दीर्घायुष्याची आणि आरोग्याची कामना केली.

शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले जातात. असा हा छोटेखानी पण अर्थपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला. ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *