डॉ. आशुतोष नरसाळेंचे शैक्षणिक यश

पारनेर : ता. प्रतिनिधी 

शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ गोरेगाव ता. पारनेर येथील माजी प्राचार्य शंकरराव नरसाळे यांचे नातू तसेच डॉ.अतुल व डॉ. शिल्पा नरसाळे यांचे चिरंजीव डॉ. आशुतोष नरसाळे यांची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून एमबीबीएस पदवी संपादन केल्यानंतर नागपूर येथील एन.पी.के. साळवे मेडिकल कॉलेजमध्ये एमडी (सायकेट्री) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी नरसाळे कुटुंबाला भेट देऊन डॉ. आशुतोष यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सौ. सुमन दाते, मा. जि.प. सदस्य वसंतराव चेडे, विश्वनाथ चौधरी, सोनाबाई चौधरी, संगिता चेडे, विजय पिंपरकर, वैशाली पिंपरकर, शहाजी बेलोटे, नंदिनी बेलोटे, आप्पा अडसूळ, वैजयंती अडसूळ, डॉ. शरद ढुमे, डॉ. शाम बेलोटे, राजू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार दाते सरांनी यावेळी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात यश संपादन करणे ही संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे. वैद्यकीय क्षेत्रासारख्या जबाबदारीच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून समाजसेवेची वाट निवडणे हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणाच्या बळावरच समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी डॉ. आशुतोष यांना रुग्णसेवेच्या कार्यात संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.

सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील आनंददायी क्षणांमध्ये सहभागी होणे ही आपली कर्तव्यभावना असल्याचे सांगत आ. दाते सरांनी नरसाळे कुटुंबीयांच्या आनंदात मनापासून सहभाग नोंदविला. त्यांच्या या आत्मीय भेटीमुळे परिसरात समाधान व अभिमानाची भावना व्यक्त करण्यात आली.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 डॉक्टर हा केवळ व्यवसाय नसून तो मानवतेची सेवा करण्याचा एक पवित्र ध्यास आहे, रुग्णाची वेदना कमी करणे हेच डॉक्टरांचे खरे यश आहे, जिथे आशा संपते, तिथे डॉक्टरांची सेवा नव्या आशेचा किरण बनते, ज्ञान, संयम आणि करुणा या तीन गोष्टी डॉक्टरांना समाजाचा खरा आधार बनवतात,डॉक्टर म्हणजे चालता-बोलता देव नाही, पण देवासारखी सेवा करणारा माणूस, समाज निरोगी असेल तर राष्ट्र मजबूत राहते आणि त्यामागे डॉक्टरांचे मोठे योगदान असते.

– आ. काशिनाथ दाते सर 
(विधानसभा सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *