चेअरमन’पदी धोंडीभाऊ शिंगोटे तर व्हा चेअरमन’पदी मिराबाई हलावळे
पारनेर/प्रतिनिधी :
खडकवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत खासदार निलेश लंके यांचे समर्थक धोंडीभाऊ कारभारी शिंगोटे यांची चेअरमनपदी, तर मीराबाई भागा हूलावळे यांची व्हाइस चेअरमनपदी निवड झाली. चेअरमन पदासाठी सूचक बाबासाहेब आग्रे, अनुमोदक बाळासाहेब शिंदे, तर व्हा चेअरमन पदासाठी सूचक शरद गागरे अनुमोदक विश्वनाथ ढोकळे हे होते.
ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत तणावपूर्ण व राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा थेट आरोप ज्येष्ठ नेते सुभाष ढोकळे यांनी आमदार दाते यांचे नाव न घेता केला आहे. निवडणुकीदरम्यान खालच्या पातळीचे राजकारण पाहायला मिळाल्याचा आरोप सत्ताधारी गटाने केला आहे.
निवडणुकीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभास ज्येष्ठ नेते सुभाष ढोकळे, बजरंग गागरे, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, बापू चत्तर, रायभान औटी, आत्माराम गागरे, भाऊसाहेब गागरे, राजेंद्र रोकडे, रवींद्र ढोकळे, दिनकर ढोकळे, सर भागचंद हूलावळे, संजय चिकने, ऋतिक गागरे, संतोष धोत्रे, अविनाश खाणकर यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकारी शरद गागरे, बाबासाहेब आगरी, सोमनाथ गागरे, बाळासाहेब शिंदे, विश्वनाथ ढोकळे उपस्थित होते.
यावेळी सुभाष ढोकळे यांनी आपल्या आक्रमक भाषणात स्थानिक लोकप्रतिनिधी वर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “निवडणूक प्रक्रियेदरम्यान आणि चेअरमन, व्हाइस चेअरमन निवडीच्या वेळी आमच्या गटावर अर्ज मागे घेण्यासाठी आणि निवडीसाठी मदत करण्याचा सातत्याने दबाव टाकण्यात आला. खडकवाडी गावाची ‘कामधेनू’ असलेल्या सहकारी संस्थेत लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करणे कितपत योग्य आहे? त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे?” ढोकळे यांनी पुढे सांगितले की, मतदार आणि संचालक मंडळाने या दबावाला बळी न पडता लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवली. यापुढेही कोणत्याही हुकूमशाहीला थारा दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
खडकवाडीच्या ग्रामस्थांनी आणि राजकीय जाणकारांनी यापुढे गावातील कोणत्याही निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. या निवडणुकीने गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, सहकारी संस्थेच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
उद्योजक बजरंग गागरे यांचा सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी प्रयत्न
खडकवाडी सेवा सोसायटीतील सर्व संचालकांनी व सभासदांनी दरवर्षीप्रमाणे कर्जदारांनी 0% टक्के व्याजदराने सवलत मिळावी व सोसायटी 100% वसूल व्हावी यासाठी उद्योजक बजरंग गागरे स्वतः दोन ते तीन कोटी रुपयांची मदत करणार आहेत सहकार क्षेत्र टिकविण्यासाठी ते दरवर्षी असा प्रयत्न करतात. त्यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे 30 ते 35 लाख व्याज वाचणार आहे.




