रांधे / सौ.निलम खोसे पाटील,
पारनेर तालुक्यातील प्रति अक्कलकोट म्हणून प्रसिद्ध असलेल्या रांधे च्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदीरात गुरु पौर्णिमेला अभूतपूर्व असा भाविकांच्या भक्तीचा महापूर आला होता. अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरु पौर्णिमेच्या दिवशी पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुर्तीला अभिषेक करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्र्मांचे आयोजन केले होते. या वेळी दिवसभर श्री स्वामी भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या हजेरी लावत मनोभावे दर्शन घेतले, तर रात्री ७ वाजता प्रसिद्ध किर्तनकार हभप अशोक महाराज शिंदे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन कथेवर आधारित हरि किर्तन संपन्न झाले. तदनंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाली. भाविक भक्तांना पेढे, लाडू, खडी, साखर, केळी, फळ असा प्रसाद देण्यात आला. प्रति अक्कलकोट असलेल्या रांधे च्या माळवाडी येथील या मंदिरात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे.
यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्षरशः भाविक भक्तांनी सुग्रास महाप्रसाद घेण्यासाठी मोठ्या गर्दीत पण रांगेतून मोठ्या भक्ती भावाने लाभ घेतला. तद्नंतर रांधे येथील माळवाडी हा ग्रामीण भाग असून ही दुचाकी, चार चाकी, बस व इतर अनेक वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ झाली होती. सर्व बाजूच्या मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती.
या भव्य सोहळ्याचे देखणे व निटनिटके नियोजन श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अनिलराव आवारी व अध्यक्ष सुभाषराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली पदाधिकारी व ग्रामस्थांनी केल्याने हा सोहळा नयनरम्य वातावरणात पार पडला.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
श्री स्वामी समर्थ देवस्थान चे संस्थापक प्रमुख अनिलराव आवारी यांनी सपत्नीक हभप अनेष महाराज आवारी यांचे गुरुपद स्विकारत त्यांची पादय पुजन करत त्यांच्या शुभ हस्ते गळ्यात तुळशी ची माळ घालत, त्यांना गुरुस्थानी मानले.
🔶🔶🔶🔶🔶🔶
यावेळी विशाल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भाविक भक्तांपुढे बोलताना संस्थापक अनिलराव आवारी यांनी श्री क्षेत्र रांधे ते श्री क्षेत्र अक्कलकोट पर्यंत चे ३६० किलोमीटर चे अंतर एक ही रुपया न घेता पायी प्रवास करण्याचा संकल्प व्यक्त केला, तदनंतर प्रत्येक वर्षी पायी दिंडी सुरू करण्याचाही मनोदय व्यक्त केला, हे ऐकताच भाविकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले व अनिलराव आवारी यांनी दुसऱ्या दिवशी च रांधे येथून निघोज, शिरूर, केडगाव चौफुला मार्गे श्री क्षेत्र अक्कलकोट या पायी वारीस सुरुवात ही केली. त्यांचे भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.
🔶🔶🔶🔶🔶🔶
श्री क्षेत्र रांधे येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येण्याकरिता भाविकांना रांधे फाटा ते खंडोबा मंदीर या मुख रस्त्यापासून माळवाडी, तर अळकुटी मुख्य रस्त्यापासून माळवाडी, असे दोन मार्ग आहेत, पण हे दोन्ही मार्ग खड्डे, दगडगोटे व काट्या युक्त, चिखलमय, अरुंद रस्ता आहे, या रस्त्याचे मजबूती करण, रुंदीकरण करून सिमेंट काँक्रीटीकरण होणे, खूप गरजेचे आहे अशी अनेक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भाविकांनी मागणी व्यक्त केली आहे.






