पारनेर / भगवान गायकवाड, 
 पारनेर महाविद्यालयाच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या प्रवेशद्वारा शेजारी पाऊसाचे गढूळ पाण्याचे तळे साचत असल्याने या रस्त्यावरून परिसरातील वयोवृद्ध नागरिक,लहान मुले, मुली, पारनेर महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थांनी, यांची कायमच वर्दळ असते. या साचलेल्या गढूळ पाण्यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे अंगावर पाणी उडत असल्याने मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेली दोन वर्षापासून या साचलेल्या गढूळ पाण्याचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. या प्रश्नावर अनेक वेळा समस्या दाखवण्याचा प्रयत्न केला पण पारनेर नगर पंचायतचे गलथानपणा मुळे गेली दोन वर्षापासून ज्वलंत समस्या सुटू शकत नाही! हे विशेष आहे. या प्रश्नासाठी राष्ट्रवादीचे नेते अर्जुन भालेकर यांनी स्वतः या प्रश्न लक्ष घालून नगर पंचायतचे इंजिनियर यांना समस्या दाखवण्यासाठी बोलावून घेतले होते. या इंजिनियरने सुद्धा दोन दिवसात प्रश्न सोडवण्याचा शब्द भालेकर यांना दिला होता. आता महिना झाला तरी हि समस्या जशीच्या तशी आहे. कर्मचारी उपनगराध्यक्ष यांच्या सूचनांना कचऱ्याची पेटी दाखवत आहे असे दिसून येत आहे. पारनेर महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी पण पारनेर नगरपंचायत यांना वेळोवेळी अवगत केले होते पण त्यांचीही बोळवण केली आहे. हि समस्या सोडवण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
  सध्या चार पाच दिवस झाले रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसाने रस्त्यावर पाणी साचत असल्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या गढूळ पाण्याचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे कडा उघड्या पडल्याने अनेक नागरिक व कॉलेज विद्यार्थी दुचाकी वरून घसरून पडले आहेत त्यांना किरकोळ जखमा पण झाल्या आहेत. साचलेल्या गढूळ पाण्याचा त्रास अजून किती दिवस सहन करावा लागणार आहे. येत्या दोन तीन दिवसात प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला नाही तर सामाजिक कार्यकर्ते पारनेर नगर पंचायतचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करणार आहेत.
🔶🔶🔶🔶🔶🔶
आता पर्यंत बऱ्याच वेळा पारनेर नगर पंचायतचे अभियंता आणि नगरसेवक साचलेल्या पाण्याची समस्या पाहून गेले आहेत परंतु प्रत्यक्षात कोणीच समस्या सोडवली नाही. या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दोन वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. नगर पंचायतने तातडीने प्रश्न मार्गी लावावा.
– निखिल गायकवाड, ग्रामस्थ पारनेर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *