आयटी इंजि काजल आंधळे हिने रेखाटलेले स्केच व्हायरल; तरुण पिढीच्या हृदयात दादांचे स्थान

पारनेर / भगवान गायकवाड, 
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला स्व. अजित पवार यांची राज्यातील युवक आणि युवतींमध्ये सुद्धा प्रचंड क्रेझ होती. सोशल माध्यमातून युवक व युवतींनी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या आठवणी जागृत केल्या. 

पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील माजी सरपंच संजीवनी आंधळे यांची कन्या आयटी इंजि. काजल राजाराम आंधळे या युवतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हुबेहूब असे पेन्सिलने स्केच बनवत त्यांच्या आठवणी जाग्या करण्याच्या प्रयत्न केला आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना स्मरण केले. 

कु. काजल आंधळे ही पुणे येथे आयटी कंपनीत काम करत आहे. सर्वच क्षेत्रातील लोकांनी अजितदादा पवार यांना सोशल माध्यमातून श्रद्धांजली वाहिली कु. काजल आंधळे हिने अजित दादांचे पेन्सिलने स्केच रेखाटत श्रद्धांजली वाहिल्यामुळे युवक युवतींच्या मनावर त्यांच्या कार्याची किती मोठी छाप होती हे यातून दिसते. खऱ्या अर्थाने अजित पवार यांच्या रूपाने सर्व समावेशक नेतृत्व हरपल्याने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अशी दुर्दैवी घटना घडायला नको होती. 

आयटी इंजिनियर काजल आंधळे या युवतीने सांगितले की अजितदादा हे खऱ्या अर्थाने नेहमीच राज्यातील युवक व युवतींच्या भविष्याचा विचार करून त्यांना आधुनिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असत पिंपरी चिंचवड पुणे या भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या जगभरातून आणल्या व आयटी क्षेत्राला ओळख निर्माण करून दिली. अशा या महान नेत्याचे कार्य नेहमीच या पुढील काळात स्मरणात राहील. 

🔶🔶🔶🔶🔶🔶
अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे हृदय विदीर्ण झाले आहे. युवक-युवतींचे लाडके नेते, विकासपुरुष, समावेशक नेतृत्व हरपले. त्यांनी पिंपरी-चिंचवड-पुण्यात आयटी क्रांती घडवली, रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण केल्या. काजल आंधळेसारख्या युवतीने रेखाटलेले स्केच त्यांच्या लोकप्रियतेचे जिवंत पुरावे आहेत. दादांचे कार्य अमर राहील. 

– आमदार काशिनाथ दाते (पारनेर नगर विधानसभा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *