पारनेर / भगवान गायकवाड, 
         पारनेर तालुक्यातील सुपा फेज २ येथील वरून बेवरेजेस कंपनीमधून निघणाऱ्या दुषित पाण्यामुळे झालेल्या नुकसानीविरोधात व कंपनीच्या बेजबाबदार पणा विरोधात बाबुर्डीचे व्हा चेअरमन गणेश तात्याभाऊ दिवटे यांचे दि. १८ जुलै पासुन बेमुदत उपोषण चालू झाले आहे. 
        सुपा म्हसणे फाटा येथील वरून बेवरेजेस कंपनीच्या वतीने दुषित पाणी उघड्यावर सोडण्यात आले असून ते पाणी बाबुर्डी येथील विहीर, बोअरवेलमध्ये उतरत असल्याने सर्व पाणी दुषित झाले आहे, शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कंपनी व्यवस्थापनाला वारंवार पत्रव्यवहार व तोंडी सांगूनही त्यात सुधारणा होत नसल्याच्या निषेधार्थ दिवटे यांनी ग्रामस्थांसह बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
        दरम्यान शुक्रवारी पहील्या दिवशी सचिन पठारे, सतिश भालेकर, बाबुर्डीचे मा. सरपंच प्रकाश गुंड, सरपंच ईश्वर दिवटे, महेश लगड, जिज्याबापु ठुबे, देवा दिवटे मा सरपंच रमेश गवळी, अवधूत गवळी, खजिनदार गणेश ठुबे, सुंदर काकडे, सुनिल दिवटे, सौरभ भोंडवे, प्रदिप दिवटे, चेअरमन प्रकाश दिवटे, सचिन ठुबे, संदिप ठुबे, चांगदेव गारकर, सोमनाथ दिवटे, युवराज गारकर, विकास दिवटे, सुरेश काकडे, आबा गवळी, नंदू गवळी, ऋषिकेश दिवटे, रवी गवळी, सुरेश शिंगोटे, विठ्ठल दिवटे, सुभाष लगड, सनी दिवटे, प्रणव गाडगे, रविश रासकर, बाबा नाना गवळी, रोकडिया देवस्थान ट्रस्ट व बाबुर्डी ग्रामपंचायत इत्यादी ग्रामस्थ यांनी उपोषणास सक्रिय पाठिंबा दिला असून बाबुर्डी महीला भजनी मंडळ यांनीही सक्रिय सहभाग घेऊन भजन करत आपला सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *