अहिल्यानगर / भगवान गायकवाड,
– स्नेहस्पर्श प्रकल्पात गुढीपाडवा सणाचे औचित्य साधत “पुस्तकाची गुढी” उभारून नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. हा कार्यक्रम 19 मार्च 2026 रोजी स्नेहस्पर्श प्रकल्प कार्यालयात दुपारी 12 ते 1 या वेळेत पार पडला.

या कार्यक्रमासाठी इसळक गावचे सरपंच संजय गेरंगे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रकल्पाचे संचालक संजय बंदिष्टी सर, निर्मिती कंपनीचे जनरल मॅनेजर कैलास सर, प्रकल्पाचे अधीक्षक चंद्रकांत शेंबडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला प्रकल्पातील सर्व कर्मचारी व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कार्यक्रमाची सुरुवात पुस्तकाच्या गुढीची पूजा करून करण्यात आली. धीरज मनवर यांनी गुढीपाडव्याचे महत्त्व मुलांना समजावून सांगताना गुढी ही विजय, समृद्धी आणि नववर्षाचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले.

प्रास्ताविकात चंद्रकांत शेंबडे यांनी आजच्या मोबाईल आणि रील्सच्या युगात वाचनाची सवय कमी होत चालल्याची खंत व्यक्त केली. हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असल्याने या शुभदिनी स्नेहस्पर्श प्रकल्पाची पुढील वर्षाची “वाचन” ही थीम जाहीर करण्यात आली.

यानंतर मुलांनी भाषणांद्वारे सणाचे महत्त्व मांडले. प्रमुख पाहुण्यांनी मुलांचे कौतुक करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संचालक संजय बंदिष्टी सर यांनी वाचनाचे महत्त्व सांगताना पुस्तकांमुळे विचार प्रगल्भ होतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन केले. सरपंच संजय गेरंगे यांनीही कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज मनोहर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष राठोड, युवराज बनसोडे, कौशल्या शेंबडे, सुजाता मासुळे, दिपाली बनसोडे, नलिनी घोलप, कृष्णा बोरावके व सुनिता वावधने यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *