पारनेर / भगवान गायकवाड, 
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी पारनेर तालुक्यातील हंगा येथे रविवार, दिनांक १८ रोजी सकाळी ११ वाजता शाखा वंचित बहुजन आघाडीच्या नूतन शाखेचे उद्घाटन आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गेल्या काही काळापासून पारनेर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे जाळे विस्तारत असून, तरुणांचा या संघटनेकडे कल वाढताना दिसत आहे. हंगा येथील या नवीन शाखेमुळे स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी आणि बहुजन समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रविवारी सकाळी ठिक ११ वाजता हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

    या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अरुण (आबा) जाधव उपस्थित असतील. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र करंदीकर, जिल्हा सचिव प्रल्हाद भिवसणे, जिल्हा उपाध्यक्ष जे. डी. शिरसाठ, जिल्हा उपाध्यक्ष योगेश क्षीरसागर आणि जिल्हा संघटक सुधीर ठोंबे हे मार्गदर्शन करणार आहेत.

या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे पारनेर तालुक्यातील रवींद्र साळवे, बाळासाहेब गायकवाड, विजय साळवे, अनंत श्रीमंदिलकर, सुरेश सातपुते, दिपक गायकवाड, संतोष अडसूळ, राहुल घंगाळे, शिवाजी शिंदे, जय गायकवाड, प्रकाश भालेराव, किरण शिंदे, उत्तमराव साळवे, सुखदेव थोरात, महेश पंडित, चंद्रकांत शिंदे, मोहन कसबे, रामदास कसबे, सरपंच मच्छिंद्र साळवे, प्रकाश पटेकर, संतोष विधाटे, तडके मेजर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे नियोजक आणि तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे यांनी सांगितले की, “बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. हंगा येथील शाखा उद्घाटन हा याच प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

या सोहळ्याला पारनेर तालुक्यातील जास्तीत जास्त समविचारी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त हंगा परिसरात उत्साहाचे वातावरण असून, शाखा उद्घाटनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *