विश्वनाथ दादा कोरडे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी दीपोत्सव; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पारनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजपा राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यात ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबविण्यात आला.


या उपक्रमांतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये मंदिरे, सार्वजनिक चौक तसेच घरांसमोर नागरिकांनी दिवे प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या उपक्रमाची सुरुवात वडझिरे येथे करण्यात आली. यावेळी विश्वनाथ दादा कोरडे यांच्या हस्ते पहिला ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर देवीभोयरे, जवळा, कान्हुर पठार, पानोली, पुणेवाडी, पारनेर, सुपा, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, निघोज, अळकुटी यांसह तालुक्यातील विविध गावांमध्ये भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दीपोत्सव साजरा केला.


यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘नरेंद्र मोदीजी आगे बढो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सायंकाळच्या वेळी गावागावांत प्रज्वलित करण्यात आलेल्या दिव्यांमुळे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी बोलताना विश्वनाथ दादा कोरडे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. त्यांच्या सेवाकार्याला पाठबळ देण्यासाठी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, या प्रार्थनेतून पारनेर तालुक्यात ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबविण्यात आला.”

तालुक्यातील विविध भागांत या उपक्रमाला नागरिकांचा, विशेषतः महिला व युवकांचा सहभाग मिळाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनीही १७ सप्टेंबर २०२६ रोजी वाढदिवसानिमित्त देशभरातून मिळालेल्या शुभेच्छा व आशीर्वादाबद्दल नागरिकांचे आभार मानले.

या कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य राजाराम एरंडे, सुभाष सुरुडे, सोपान करकंडे, सरपंच पंकजदादा कारखिले, उपसरपंच विकासराव सावंत, कमलाकर बेलोटे, विश्वनाथ बेलोटे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पै. जयदीप सालके पाटील, संदीप सालके पाटील, अर्जुनराव नवले, कानिफनाथ ठुबे, संदीप ठुबे, गोकुळ ठुबे, कृष्णाजी बडवे काका, नवनाथ सालके, कैलास बरशीले, अमोल गायकवाड, संभाजी मोरे, शुभम निघूट, डॉ. सुरेश खणकर, गणेश बेलोटे, सचिन सालके, वरद बडवे यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *