पारनेर/प्रतिनिधी :
पंचायत समिती पारनेर व पारनेर तालुका कला शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गीतगायन स्पर्धेत श्री खंडेश्वर विद्यालय, पिंपळगाव रोठा यांनी मोठ्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत तालुक्यातील 11 शाळांमधून 18 संघांनी सहभाग घेतला होता. दि. 19 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करत यश मिळवले.
सहभागी विद्यार्थिनींमध्ये अदिती सखाराम शिकारे, वैष्णवी नामदेव शिकारे, कोमल जयसिंग शिकारे, अदिती चंद्रभान शिकारे, श्रुती गणेश झावरे, समृद्धी विश्वास पुंडे आणि अवनी सुनील घुले यांचा समावेश होता. या विद्यार्थिनींना विद्यालयातील शिक्षक श्री. पानसरे सर, श्री. घुले सर आणि लहु रणशुर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी सादरीकरणात नैपुण्य दाखवत उपस्थितांचे मन जिंकले.
श्री भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, वासुंदे संस्थेचे अध्यक्ष सुजितराव झावरे पाटील, सचिव सुदेशभैय्या झावरे पाटील, संस्था निरीक्षक शरदराव पाटील सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक कोंडीभाऊ मध्ये सर, स्थानिक स्कूल कमिटी आणि सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले. या यशामुळे विद्यालयाचे नाव तालुक्यात उज्ज्वल झाले असून, विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. भविष्यातही अशा स्पर्धांमध्ये विद्यालय उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *