पारनेर | ता. प्रतिनिधी,

पारनेर तालुक्याच्या वायव्य भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला आज नवे बळ मिळाले. विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अळकुटी व परिसरातील विविध कार्यकर्त्यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका उपाध्यक्षा सौ. रेश्माताई मच्छिंद्र गलांडे आणि तालुका उपाध्यक्ष सुरेश परंडवाल यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात आसिफ मोमीन, राजू पारखे, अभय शित्रे, राजेंद्र शिरोळे, राजेंद्र बोरुडे, गणेश शित्रे, अयुब मोमीन, नवनाथ गाडगे, सलीम मोमीन, सोहेल मोमीन, आयान मोमीन, अस्लम शेख आणि इकबाल आतार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेत पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस हा सामान्य माणसाच्या आशा- आकांक्षांचा पक्ष आहे. जनतेचा विश्वास आणि विकासाचे राजकारण हीच आमची खरी ताकद आहे. अळकुटी परिसरातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखत जनतेच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने काम करू.”

कार्यक्रमास पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, नगरसेवक अशोक चेडे, पारनेर शहर उपाध्यक्ष सुनिल गाडगे, मच्छिंद्र गलांडे, सुखदा परंडवाल, गणेश गलांडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अळकुटी व परिसरातील या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वायव्य भागात अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे. स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यांवर जनतेचा वाढता विश्वास आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे विविध स्तरांतील कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहे. आगामी काळात या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार आणखी मजबूत होईल.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
▪️ “अळकुटी आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्वास आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विकासाभिमुख, सर्वसमावेशक आणि जनतेशी नाळ जोडलेल्या नेतृत्वामुळे आज अनेक युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने पक्षात सहभागी होत आहेत. वायव्य भागातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून अधिक ताकदीने काम करू. जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद असून, तो कायम राखण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”

– रेश्माताई गलांडे (राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका उपाध्यक्षा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *