पारनेर / भगवान गायकवाड
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी पानोली येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य.नवनाथ बाबाजी खामकर यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या अधिकृत निवडीचे पत्र समता परिषदेच्या पदाधिकारी यांनी त्यांना दिले आहे.
आतापर्यंत केलेली सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्याची दखल घेऊन समता परिषदेने त्यांची सार्थ निवड केली आहे. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, ओबीसी महामंडळ माजी अध्यक्ष, बापूसाहेब भुजबळ,प्रदेश संघटक रवी सोनवणे,प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, प्रदेश प्रचारक डॉ.नागेश गवळी, माजी तालुकाध्यक्ष बबनराव घुमटकर, अण्णासाहेब शेलार, सुवर्णा घाडगे, मच्छिंद्रशेठ माळी, मुकुंद सोनटक्के, किसनराव रासकर, खंडूजी भुकण, संतोष विरकर, प्रशांत शिंदे, श्रीधर गाडीलकर, सचिन खामकर, शंकर रासकर, आकेश जमदाडे, पोपट काळोखे, दिलीप काळोखे, विजय मंडलिक, प्रभाकर घोलप, विशाल जमदाडे, अजित बोदगे, संदीप रासकर, तन्मय खामकर, प्रसाद जमदाडे, अविनाश लोखंडे, विशाल क्षीरसागर, ओम क्षीरसागर अशोक गायकवाड, बाळासाहेब बोराटे, जालिंदर बोरुडे, वसंत रांधवन, बंडू कोथिंबीरे, अनिल निकम, संजय डाके, अर्जुन मेहेत्रे, रोहित पुंड, सुरेश थोरात, नानाभाऊ गाडीलकर, गोरख आळेकर, धनंजय डहाळे, प्रयाग लोंढे, कल्याण अनारसे, रामदास हजारे, शरद मेहत्रे यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील समता परिषदेचे पदाधिकारी समर्पित समता परिषदेचे कार्यकर्ते आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.




