पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील भांडगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन झाले. शाळेच्या अंगणवाडी सेविका सौ. संगीता जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर प्रेरक भाषणे केली. याप्रसंगी अंगणवाडी सेविका सौ. संगीता जाधव यांनी डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. “संविधानाचे जनक” असलेल्या डॉ. आंबेडकरांचे कार्य अतिशय मोलाचे आणि महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सालके यांनी केले. यावेळी रोहिदास पवार, सुनिता कुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर खरमाळे, उपाध्यक्षा सविता भुजबळ, माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष गणेश खरमाळे, उपाध्यक्ष गणेश शेलार, दत्ता भुजबळ, दिलीप जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक अप्पासाहेब नरवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




