निघोज / ता. प्रतिनिधी,
आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे मळगंगा देवी यात्रा समिती, मुंबई येथील व्यवसायीक शंकरशेठ रामचंद्र वराळ पाटील, निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांनी पाठपुरावा केल्याने कुंड रस्त्याची डागडुजी सुरू झाली असून येत्या गुरुवार पर्यंत हे काम पुर्ण होणार असल्याची माहिती मळगंगा देवी यात्रा समीतीचे अध्यक्ष शिवाजीराव लंके, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, विठ्ठलराव कवाद, रुपेश ढवण यांनी दिली आहे. राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव दि.१ एप्रिल पासून सुरू झाला आहे. मुख्य यात्रा शुक्रवार दि. १० एप्रिल पासून सुरू होत आहे. जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील कुंड यात्रा रविवार दि.१२ रोजी असून निघोज ते कुंड हा चार किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी संबधीतांनी करण्यात आली होती. याबाबत ग्रामस्थ शिष्टमंडळ आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे गेले होते. आ. दाते सर यांनी लगेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना याबाबत सुचना दिल्याने हे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. कुंडावरील यात्रेसाठी पुणे, अहिल्यानगर तसेच मुंबई येथून लाखोंच्या संख्येने भावीक येत असतात. निघोज परिसरातील कुंड व शिरुर तालुक्यातील टाकळीहाजी या दोन ठिकाणी मळगंगा देवीचे मंदीरे असून दोन्ही ठिकाणचे दर्शन भावीकांना मिळत असल्याने भावीकांची संख्या मोठी असते. अहिल्यानगर जिल्हा, जुन्नर तालुका तसेच कल्याण,ठाणे, मुंबई येथील भावीक निघोज मार्गे कुंडावर जात असतात मात्र रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने हा चार किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने यात्रेकरू, देवीचे भावीक तसेच ग्रामस्थ यांना रस्त्याचा त्रास होऊ नये यासाठी ही डागडुजी सुरू केली असून या रस्त्याच्या डागडुजीचा समारंभ मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवाद सर, उपाध्यक्ष तथा मळगंगा कंट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अमृताशेठ रसाळ, सचिव शांताराम कळसकर, मळगंगा देवी यात्रा समीतीचे अध्यक्ष शिवाजीराव लंके, यात्रा समीतीचे विश्वस्त दिलीप ढवण, भास्करराव कवाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.बाळासाहेब लामखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे संघटक मंगेश वराळ, विश्वस्त ॲड. ज्ञानेश्वर लामखडे, रमेशशेठ ढवळे, बबनराव ससाणे, रोहिदास लामखडे, विठ्ठलराव कवाद, रमेशशेठ वरखडे भास्कर ढवण आदींच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔶🔶🔶🔶🔶🔶
पारनेर तालुक्यातील तिर्थक्षेत्र तसेच पर्यटन स्थळ विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत, जगप्रसिद्ध रांजणखळगे हा राज्याचा अनमोल ठेवा आहे, देशपरदेशातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. तसेच राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवी ही नवसाला पावणारी देवस्थान आहे, वर्षभरात विविध उत्सवासाठी या ठिकाणी राज्यातून तसेच परराज्यातील लाखो भाविक मोठ्या संख्येने येत असतात, या ठिकाणच्या विकासासाठी आपले विशेष लक्ष आहे.
– आमदार काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)




