पारनेर | प्रतिनिधि,
पारनेर तालुक्यातील देसवडे गावच्या शिवारात मांडवे ते देसवडे गावाकडे जाणाऱ्या रोडवर वाळू वाहतूक करताना टाटा कंपनीचा पिवळ्या राखाडी रंगाचा डंपर MH16 सीडी 7107 राहुल साहेबराव गागरे राहणार मांडवी खुर्द तालुका पारनेर यांच्या मालकीचा डंपर पारनेर पोलिसांनी मोठ्या सीताफिने पकडला आहे. यामध्ये एक ते दीड ब्रास वाळू डंपरच्या मागील हौद मध्ये मिळून आले असून सुमारे 15 लाख 15 हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल विवेक दिलीप दळवी नेमणूक पारनेर पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल साहेबराव गागरे राहणार मांडवे खुर्द याच्यावर 170/2025,कलम 303(२)प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर तालुक्याच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदीपात्रातून वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक महसूल विभागाच्या नाकावरती टीचून होत आहे तरीही महसूल विभाग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. याउलट पारनेर पोलीस विभाग अवैध वाळू तस्करीविरोधात अॅक्शन मोडवर आले आहेत.
ही कारवाई पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश डहाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोडवे, पोलीस कॉन्स्टेबल विवेक दळवी, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साठे, व पारनेर पोलीस यांनी केली आहे.
—————-




