सोन्याची नथ, पैठणीसह विविध बक्षिसांची लयलूट; आमदार काशिनाथ दाते यांची उपस्थिती

पारनेर : प्रतिनिधी
पारनेर शहरातील बुगेवाडी येथे दुर्गामाता युवा मंचच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव २०२६ अंतर्गत सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई सोबले यांच्या पुढाकारातून महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर’ व ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नारळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
निवेदक उत्तम घोलप यांनी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे संचालन केले. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांना सोन्याची नथ, पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिभा जालिंदर थोरात, द्वितीय क्रमांक स्वाती शंकर कावरे, तर तृतीय क्रमांक गीतांजली सतीश कावरे यांनी पटकाविला. या कार्यक्रमाला पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी भेट देऊन उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीत दुर्गामाता देवीची आरती करण्यात आली. यावेळी प्रशांत गायकवाड, वसंत चेडे, अशोक चेडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी विठ्ठल कावरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली.

विठ्ठल कावरे, हनुमंत बुगे, धनाजी थोरात, रामदास थोरात, कोंडीबा थोरात, विजय कावरे, यश बुगे, यश मते, विनायक घुगे, चैतन्य कावरे, प्रथमेश कावरे, मयूर कावरे, मंगेश कावरे, तेजस कावरे, अनिकेत कावरे, रोहित थोरात, निखिल कावरे, सखाराम बुगे, रामदास वाळुंज, ठकाराम बुगे, गणेश बुगे, सूरज बुगे, बाळासाहेब घुगे, भाऊ कावरे, सखाराम कावरे आदी उपस्थित होते.

सुनिताताई सोबले या पारनेर शहरातील सोबलेवाडी व बुगेवाडी परिसरात महिलांसाठी सातत्याने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवितात.

🔶🔶🔶🔶🔶
महिलांना आपल्या दैनंदिन कामकाजातून थोडा विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा आणि महिलांनी एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवावेत, या उद्देशाने ‘होम मिनिस्टर’ व ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन केले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून समाधान वाटले. यापुढेही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक-सांस्कृतिक एकोपा वाढविण्यासाठी असे विविध उपक्रम सातत्याने राबविणार आहे.

– सुनिताताई सोबले (सामाजिक कार्यकर्त्या, पारनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *