आग्रे परिवाराने आपल्या बहिणीच्या स्मृती जपण्यासाठी एकत्र येत आयोजित केलेला स्मृतीदिन हा दुर्मिळ योगायोग – रविंद्र राजदेव 


नांदूर पठार (प्रतिनिधी):, 
एखाद्या व्यक्तीचा जन्म, मृत्यू आणि स्मरण हे एकाच विशिष्ट महिन्यात येण्याचा अनोखा योगायोग क्वचितच पाहायला मिळतो. पारनेर तालुक्यातील नांदूर पठार येथे असाच एक भावपूर्ण प्रसंग अनुभवायला मिळाला. ‘धोंड्याच्या’ (अधिक) महिन्यात जन्मलेल्या, याच महिन्यात मृत्यू पावलेल्या दिवंगत धोंडाबाई यांचा स्मृतीदिनही याच धोंड्याच्या महिन्यात आग्रे परिवाराच्या वतीने मोठ्या भक्तिभावात आणि आनंदात साजरा करण्यात आला.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
नावामागील रंजक इतिहास आणि अनोखा योगायोग…
सन १९५० मध्ये धोंड्याच्या (अधिक) महिन्यात आग्रे परिवारात एका कन्येचा जन्म झाला. या विशिष्ट महिन्यातील जन्मामुळे तिचे नामकरण ‘धोंडाबाई’ असे करण्यात आले. काळाच्या ओघात सन २०२२ मध्ये धोंडाबाईंचे निधन झाले, आणि विशेष म्हणजे तो महिनाही ‘धोंड्याचाच’ होता. या अनोख्या योगायोगाचे स्मरण ठेवून, आज आग्रे परिवाराने त्यांचा स्मृतीदिनही याच धोंड्याच्या महिन्यात आयोजित करून तसेच सर्वांना धोंड्याचे जेवणाचे अन्नदान करून त्यांच्या आठवणींना अनोख्या पद्धतीने उजाळा दिला.


हा भावपूर्ण सोहळा धोंडाबाईंचे भाऊ बाबाजी आग्रे, नामदेव आग्रे, गबाजी आग्रे (सर), दत्ता आग्रे, गणेश आग्रे आणि दिनेश आग्रे या माहेरवाशीयांनी आयोजित केला होता.

 यावेळी त्यांची मुले गोविंद, बाळाशीराम, तसेच मुली आणि सर्व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवचन आणि मान्यवरांची मांदियाळी…
या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ह.भ.प. तानाजी महाराज दाते यांचे सुश्राव्य प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.


या कार्यक्रमासाठी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते आणि भावी जि.प. सदस्य रविंद्रशेठ राजदेव, नवनाथ पाटील घोलप, कातळवेढा सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव डोंगरे, झावरे सर, चेअरमन मदन देशमाने, चेअरमन पोपट राजदेव, माजी सरपंच भानुदास आग्रे, माजी सरपंच सौ. शांताबाई राजदेव, बाळासाहेब आहेर, सदाशिव ठुबे, निमसे वकिल साहेब, नारायण राजदेव, चौधरी सर, अंकुशराव चिकने, रामभाऊ चौधरी, भागा महाराज चौधरी, जनार्दन चौधरी आणि विष्णू ठुबे, पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मंडळी आवर्जून उपस्थित होती. याशिवाय सावरगाव, आणे, पेमदरा, आणि चिकणेवाडी अशा विविध गावांमधून आलेले पाहुणे आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्याचे साक्षीदार झाले.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
कार्यक्रमात बोलताना टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रविंद्रशेठ राजदेव यांनी दिवंगत धोंडाबाईंचा संपूर्ण जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या संघर्षाचे आणि साधेपणाचे वर्णन करताना उपस्थितांचे डोळे पाणावले. तसेच, आग्रे परिवाराने एकत्र येत आपल्या बहिणीचा आणि आईचा हा अनोखा स्मृतीदिन ज्या पद्धतीने साजरा केला, त्याबद्दल राजदेव यांनी कुटुंबाचे विशेष कौतुक केले.

एका साध्या परंतु संस्कारक्षम मातेच्या स्मृतींना उजाळा देणारा हा सोहळा नांदूर पठार परिसरातील नागरिकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *