महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुपा -पारनेर रोड जुन्या पोलिस स्टेशन शेजारी दिनांक ६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित केलेल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नागरिक तात्याभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुपा पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पारनेर तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष तथा माजी उपसरपंच दत्तानाना पवार, सरचिटणीस सागर मैड, महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, कडुस मनसे ग्रामपंचायत सदस्य नारायण नरवडे,सुपा अध्यक्ष अक्षय सुर्यवंशी, माजी सरपंच बाळासाहेब पवार, सेवा सोसायटीचे संचालक पांडुरंग पवार, कामगार सेना अध्यक्ष कल्याण शहाणे, तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात, खरेदी विक्री संघाचे संचालक सुनील पवार, ॲम्बुलन्स चालक सादिक भाई शेख, गितकार अरूण वाळुंज साहेब यांच्या सह उद्योजक अतुल शेठ शहाने शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



         यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर मंडळींचा सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रांत स्वाभिमानाने शेतकरी बांधवांसाठी शेत – पाणंद शेत, रस्ते चळवळ गावपातळी ते राज्यपातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांचा सुपा पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांचा अविनाश पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नगर -पुणे महामार्गावर अपघात ग्रस्तांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणाऱ्या अँब्युलन्स चालक सादिक भाई शेख यांचा सन्मान करण्यात आला. वाहतूक पोलीस बांधव, सुपा परिसरात ऊन, वारा, पाऊस, याची तमा न बाळगता अविरत सेवा करणाऱ्या महावितरणच्या वायरमन जरे, थोरात , विटेकर तसेच पारनेर तालुक्यातील निर्भिड आणि स्वाभिमानी बांधव पत्रकार शरद रसाळ, पत्रकार सुभाष दिवटे, दत्ता गाडगे,यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

          महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या या शिवजयंतीचे हे १६ वे वर्षे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती घेण्यात आली. यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

          कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार, मनसे सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुरेश सुर्यवंशी यांच्यासह मनसे सैनिकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण वाळुंज यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार शरद पवळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *