नारायणगव्हाण कांडेकर दरा रस्ता कामास सुरुवात 

पारनेर / ता. प्रतिनिधी,  
गेल्या विधानसभा निवडणूकीतील विजय संपादन केल्यापासून तालुक्यातील वाड्या- वस्त्यांवरील कच्च्या रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने पुढाकार घेत असून नुकतेच पुन्हा एकदा नव्याने नारायणगव्हाण येथील कांडेकर दरा रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन करताना आ. दाते बोलत होते. शासनाच्या २५१५ योजना अंतर्गत १५ लाख रुपयांच्या निधीतून या कामास मंजुरी देण्यात आली आहे.



यावेळी बोलताना आ. दाते म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. वाड्या-वस्त्यांवरील कच्चे रस्ते पक्के करण्यासाठी आपण कटिबद्ध असून या कामांमुळे नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी दूर होऊन विकासाला गती मिळणार आहे.

या कार्यक्रमास माजी सभापती गणेश शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, लाडकी बहिण योजना तालुकाध्यक्ष सुनील थोरात, उद्योजक सुखदेव पवार, भाजप सरचिटणीस सागर मैड, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुषमा रावडे, मा. सरपंच सुरेश बो-हुडे सर, भाजप नेते काशिनाथ नवले, युवासेना तालुका अध्यक्ष तारा दरेकर, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब नवले, हेमंत कांडेकर, पत्रकार दिपक करंजुले, सहादु शेळके, पोपटराव नाईक, मेजर काशिनाथ नवले, मेजर विठ्ठल कांडेकर, मेजर सतीश गाडेकर, हुसेन शेख, धनंजय नाईक, सचिन कांडेकर, शंकरराव कांडेकर, संदीप कांडेकर, सुर्यभान कांडेकर, पांडुरंग शेळके, गणेश नवले, विष्णू दरेकर, भानुदास वेताळ, अविनाश टुडे, फक्कडराव शेळके, नारायण कांडेकर, लताबाई कांडेकर, मनीषा कांडेकर, शीतल कांडेकर, संदीप कांडेकर, चंदर कांडेकर, भरत भोसले, दादासाहेब शेळके, सुदाम नवले, साहेबराव शेळके, मेजर सतीश चिपाडे, सुभाषशेठ चिपाडे, किसन चिपाडे, राहुल कांडेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता कच्चा असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात चिखल व घसरड्या परिस्थितीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. आता या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला बळ मिळणार आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 “गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली असून ग्रामस्थांसाठी हा अत्यंत दिलासादायक निर्णय आहे. आमदार काशिनाथ दाते सरांच्या प्रयत्नांमुळे हे काम मार्गी लागले असून यामुळे गावाच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल.”

– सुरेश बो-हुडे सर, मा. सरपंच नारायणगव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *