पारनेर/ प्रतिनिधी, 

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त निघोज-कान्हूर पठार मंडल आणि अष्टविनायक रक्तपेढी, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष मा. श्री. दिलीपजी भालसिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप राज्य परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, मंडल अध्यक्ष किसनराव शिंदे, निघोज गट नेते सचिन वराळ पाटील, माजी जि.प. सदस्य राजाराम एरंडे, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष सोनालीताई सालके, माजी तालुका अध्यक्ष पोपटराव मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी संग्राम पावडे, निशिगंधा बोरुडे, कमलाकर बेलोटे, संतोष सातपुते, तुकाराम येवले, मोहन काळे, दिलीप पारधी, संभाजी मोरे, बन्सी बढे, आप्पाभाऊ गोपाळे, राजू गोपाळे, निलेश थोरात, पांडुरंग वडणे, एकनाथ तिकोने, प्रमोद कावरे, मनोहर राउत, मोहन खराडे, हरेराम खोडदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, वाढदिवसानिमित्त भेटवस्तू किंवा बॅनर न लावता रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवावेत आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला शक्य तेवढी मदत करावी. या सूचनांचे पालन करत हा कार्यक्रम यशस्वी करण्यात भाजप कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. – विश्वनाथ कोरडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजपा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *