पारनेर / प्रतिनिधी,
अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (सन २०२५-२६) मधून मंजूर झालेल्या देसवडे ते टेकडवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण (अंदाजे २० लाख रुपये) या महत्त्वाच्या कामाचे भूमिपूजन पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या वतीने डॉ. प्रदीप दाते यांच्या हस्ते संपन्न झाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ निमित्त आमदार दाते सर व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब मुंबईत असल्याने त्यांच्या वतीने डॉ. दाते यांनी या कामाचा शुभारंभ केला. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ होणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
यावेळी पांडुरंग गुंड, बंडू औटी, भाऊसाहेब टेकूडे, संपत तोरकड, बाजीराव शिंदे, बबन गुंड, धोंडिभाऊ दाते, माऊली दाते, नवनाथ दाते, पोपट शिंदे, सुरेश तोरकड, सहकारी दाते, भावका दाते, गोविंदा औटी, संदीप औटी, प्रकाश टेकूडे, बाळू गुंड, रभाजी टेकूडे, जिजाभाऊ टेकूडे, मछिंद्र गुंड, रोहिदास कानडे, शिवाजी टेकूडे, राजेंद्र गुंड, प्रदीप टेकूडे, प्रतुल टेकूडे, हरिचंद्र गुंड, दिपक गुंड, ज्ञानदेव दाते, प्रदीप गुंड, दिनकर दाते, मंगेश हुलावळे, एकनाथ गुंड, संतोष टेकूडे यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. प्रदीप दाते म्हणाले की, “आमदार काशिनाथ दाते सरांचे काम हे नेहमीच समाजाभिमुख राहिले आहे. समाजाभिमुख कार्य म्हणजे केवळ विकासकामे उभारणे नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने त्या कामाचा किती उपयोग होईल याचा विचार करून ते काम उभे करणे, समाजातील प्रत्येक घटकांना समान न्याय देत त्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी दाते सर कायम प्रयत्नशील राहिले आहेत. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी केलेले त्यांचे गेल्या चार दशकातील कार्य पाहिले तर त्यांच्या समाजाभिमुख दृष्टीचा प्रत्यय येतो.”
या विकासकामामुळे देसवडे ते टेकडवाडी दरम्यान परिसरातील नागरिकांना वाहतूक करणे सुलभ होऊन त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“गावोगावी रस्ते, पायाभूत सुविधा उभारण्यासोबतच लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडवणे हीच आमदार दाते सरांची कार्यशैली आहे, समाजासाठी निःस्वार्थपणे काम करत राहणे हीच खरी लोकसेवा असून प्रत्येकाने आपल्या परीने समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणे आवश्यक आहे.”
– डॉ. प्रदिप दाते,




