पारनेर / भगवान गायकवाड,
वंचित बहुजन आघाडीच्या संघटन विस्तारासाठी आणि प्रस्थापितांच्या राजकीय गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे रविवार दि.२८ रोजी सकाळी १० वाजता अळकुटी बसस्थानक येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडी पारनेर तालुकाप्रमुख बाळासाहेब पातारे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्ट सोसून आणि आपल्या कुटुंबाचा त्याग करून बहुजन समाजाला सामाजिक गुलामगिरीतून मुक्त केले. बाबासाहेबांनी दिलेला “संविधानाचा रथ पुढे न्या” हा संदेश सार्थ ठरवण्यासाठी आता राजकीय गुलामगिरी झुगारून देण्याची वेळ आली आहे.सध्याच्या राजकीय परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. प्रस्थापितांच्या राजकारणात भरडल्या जाणाऱ्या वंचित समूहाला न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. या संघर्षात त्यांना साथ देणे आणि त्यांचे हात मजबूत करणे ही प्रत्येक आंबेडकरी अनुयायी व बहुजन बांधवांची नैतिक जबाबदारी असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.या उद्घाटन सोहळ्यासाठी किरण शिंदे , बाळासाहेब गायकवाड, संदीप जाधव, विजय साळवे, दीपक गायकवाड, जय गायकवाड, सुखदेव थोरात, मनोज सूर्यवंशी, माही सूर्यवंशी, अनंत श्रीमंदीलकर, रवींद्र साळवे, आनंद जाधव, प्रवीण शिरसाट व सर्व कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. प्रस्थापितांच्या राजकीय गुलामगिरीतून मुक्ती आणि संविधान रक्षण. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व प्रमुख पदाधिकारी. समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आपली एकजूट दाखवण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी केले आहे.




