नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पाहणी व मदतीची हमी

पारनेर / ता. प्रतिनिधी,  

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी ढवळपुरी व परिसरातील वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश दिले. तहसीलदार गायत्री सौंदाणे व तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांच्या उपस्थितीत त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान प्रत्यक्ष पाहून सबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यास सांगितले.


यावेळी बोलताना आमदार दाते सर म्हणाले, ढोकी, धोत्रे, ढवळपुरी, वडगाव आमली, भाळवणी या भागात झालेल्या अचानक गारपीटीमुळे कांदा, वाटाणा, मका, कलिंगड, मिरची, टोमॅटो आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च करून उभे केलेले पीक ऐन काढणीच्या वेळी नष्ट झाल्याने ते हवालदिल झाले आहेत. “मी स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने या वेदना मला पूर्णपणे समजतात. या संकटकाळात मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असा दिलासादायक विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.


घटनेची माहिती त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी यांना दिली असून प्रशासनानेही तातडीने हालचाल केली आहे. आज पाहणी करून उद्या अहवाल सादर केला जाणार असून त्यानंतर कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन स्वतंत्र पंचनामे सुरू करतील. त्यानंतर शासनाकडे अहवाल सादर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी कृषी अधिकारी मयुरी गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, सुभाषराव दुधाडे, डॉ. भाऊसाहेब खिल्लारी, उपसरपंच बबनराव पवार, बाबाजी चौधरी, लिंबाशेठ चौधरी, चेअरमन देविदास फलके, सुभाष सासवडे, दीपक भागवत, गोविंद कुटे, संतोष थोरात, सुधाकर गावडे, प्रकाश (नंदू) वाघ, अमोल ठाणगे, भिकाजी वाघ, किरण वाळुंज, भाऊसाहेब चौधरी, अण्णा वाघ, किसन वाघ, संतोष वाघ, भीमाजी देशमुख, निलेश चौधरी, जयसिंग वाघ, सुरेश देशमुख, गणेश विरोळे, बाबासाहेब वाघ, नवनाथ वाघ, वैभव शिंदे, नागेश शेळके, दीपक देशमुख, रामा देशमुख, सि.टी. देशमुख, निंबा देशमुख, प्रदीप वाघ, आबा वाघ, बाळकृष्ण चौधरी, संदीप वाघ, सुभाष शिंदे, उत्तम शिंदे, शिवाजी वाघ, तुळशीराम शिंदे, बाळकृष्ण वाघ, दत्तात्रय वाघ, शरद वाघ, मिनीनाथ शेळके, राजाराम वाघ, लिंबा देशमुख यांसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 शेतकऱ्यांना आवाहन करतो की, “निसर्गाच्या आपत्तीवर आपले नियंत्रण नसले तरी महायुती सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असून यापूर्वीही कर्जमाफी व अतिवृष्टीची मदत दिली आहे. याही वेळी शासन निश्चितच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील,” असा विश्वास आम्हाला आहे. 

– आ. काशिनाथ दाते सर 
(विधानसभा सदस्य)

🔶🔶🔶🔶🔶🔶
 अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ढवळपुरी, ढोकी, धोत्रे, भाळवणी, वडगाव आमली, निघोज आदी गावांमध्ये कांदा, टरबूज, भाजीपाला, फळबागा व चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार काशिनाथ दाते सर यांच्या समवेत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. उद्यापासून पुढील चार ते पाच दिवसांत सर्व नुकसानग्रस्त भागांचे सविस्तर पंचनामे पूर्ण केले जातील. त्यानंतर संपूर्ण अहवाल राज्य शासनाकडे तात्काळ पाठवण्यात येईल. शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.  

– गजानन घुले, तालुका कृषी अधिकारी पारनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *