पारनेर / भगवान गायकवाड, 

सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांना न्याय देण्यासाठी तातडीने थकीत कर्जदार व अध्यक्ष रामदास भोसले यांच्या सह संचालक मंडळाच्या व नातेवाईक यांच्या मालमत्ता जप्त करा, बँक खाते सील करा अशी मागणी शिवराय सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष विनोद गोळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडे कडे केली आहे.

पारनेर चे तीन वेळा आमदार व विधानसभा उपाध्यक्ष भूषवलेले विजय भास्कर औटी संस्थापक असलेल्या व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ठाकरे गटाचे रामदास भोसले अध्यक्ष असलेल्या सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांना गेल्या दोन वर्षांपासून ठेवी मिळत नसल्याने ठेवीदारांनी न्यायालयात, पोलिस ठाण्यात, आंदोलन व्दारे सगळे दरवाजे ठोठावत आहे. भाजीपाला विक्री करणारे, शेतमजूर यांच्या पासून तर नोकरदारांपर्यत सुमारे 100 ते 150 कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. अनेक कर्जदार मोठ्या प्रमाणावर थकीत कर्ज ठेवून व संचालक मंडळ उजळ माथ्याने फिरत आहे.या सर्वांवर कारवाई करावी,त्यांचे व नातेवाईक यांचे बँक खाते सील करावे,स्थावर मालमत्ता जप्त कराव्या अशी मागणी केली आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
कर्जदाराच्या अटकेच्या कारवाई चे स्वागत…..
सेनापती बापट पतसंस्था चे मोठा कर्जदार महेंद्र साईनाथ मंंडलिक याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली ही कारवाई स्वागतार्ह आहे. आपण पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व पोलीस उपअधीक्षक गणेश उगले, पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, सपोनी युवराज आठरे व पोलीसांचा सत्कार करणार आहोत. त्यांची धाडसी कारवाई सुरू रहावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
– विनोद गोळे, अध्यक्ष, शिवराय सामाजिक प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *