नांदूर पठार | प्रतिनिधी,
ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा गावातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने नांदूर पठार येथे सेंट्रल बँकेच्या मिनी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना आर्थिक व्यवहारांसाठी दूरचा प्रवास करण्याची गरज कमी होणार असून गावाच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.


या मिनी शाखेचे उद्घाटन परभणी जिल्हा परिषद सदस्य तथा नांदूर पठारचे सुपुत्र भरत दादा घनदाट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक अण्णा लंके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रवींद्र राजदेव, सरपंच संदीप चौधरी, उपसरपंच सुनील राजदेव, माजी सरपंच भानुदास आग्रे, हरीभाऊ आहेर, नवनाथ पाटील घोलप, दत्तात्रय देशमाने, मारुती आग्रे, पंढरी आग्रे, ज्ञानदेव लक्ष्मण चौधरी, विलास महाराज आहेर, राजेंद्र राजदेव, रामदास राजदेव, बबन घोलप, स्वप्नील राजदेव, बाबाजी चौधरी, ग्रामसेवक रामदास सांगळे, प्रकाश राजदेव, संतोष घनदाट, रामलाल राजदेव, नवनाथ आहेर, रवींद्र चौधरी, शुभम आहेर, शिवाजी महाराज आग्रे, दादा पाटील राजदेव, मोहन राजदेव, रामदास चौधरी, ज्ञानदेव श्रीपती चौधरी, भगवंत हाढवळे, राजाराम राजदेव, मंगेश आहिले, अमोल गाडगे, सागर शिरतार यांच्यासह विकास विद्यालय व प्राथमिक शाळेचे शिक्षक-विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे औचित्य साधत सरपंच संदिप चौधरी यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वही व खाऊचे वाटप करण्यात आले.


कार्यक्रमात बोलताना भरत दादा घनदाट यांनी नांदूर पठारमध्ये झालेल्या विकासकामांचे कौतुक करत ग्रामीण भागात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तर दीपक अण्णा लंके यांनी नांदूर पठारच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.


🔶🔶🔶🔶🔶🔶

📌 “ग्रामीण भागाचा विकास हा केवळ रस्ते, पाणी किंवा वीजपुरता मर्यादित नसून प्रत्येक नागरिकापर्यंत बँकिंगसारख्या मूलभूत सुविधा पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नांदूर पठार येथे सेंट्रल बँकेची मिनी शाखा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील. ही सुविधा गावाच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा देईल.”
— रविंद्र राजदेव
नेते, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट.
ग्रामीण नागरिकांसाठी आर्थिक व्यवहार अधिक सुलभ करणारी ही मिनी शाखा नांदूर पठारच्या विकासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *