रविंद्रशेठ राजदेव व सोनियाताई राजदेव यांच्या वतीने भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन; खासदार निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती
नांदूर पठार | प्रतिनिधी,
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव असलेला रक्षाबंधन सोहळा श्री. रविंद्रशेठ राजदेव, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट नेते तथा सौ. सोनियाताई रविंद्र राजदेव यांच्या वतीने आज शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी नांदूर पठार येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला अहिल्यानगर दक्षिणचे लोकनेते खासदार निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे पोपटराव गुंड, खंडोबा देवस्थानचे चंद्रभान ठुबे, नवनाथ पाटील घोलप, माजी सरपंच हरीभाऊ आहेर, माजी सरपंच भानुदास आग्रे, माजी उपसरपंच हरिभाऊ देशमाने, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका उपाध्यक्ष नवनाथ गांजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने परिसरातील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी जिलेबी व भजे यांचा नाश्ता वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला तसेच विविध गावांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब चौधरी यांनी केले, तर सोनियाताई राजदेव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी पंढरी आग्रे सर, निलेश म्हस्के, बबन आग्रे, बाबाजी आहेर, राजाराम राजदेव, माधव आग्रे, लक्ष्मण कारंडे, बाबाजी चौधरी, सखाराम आग्रे, शंकर आग्रे, बबन चौधरी, मारुती आग्रे, नामदेव आग्रे, गोरख आग्रे, विठ्ठल नेहरकर, कारभारी घनदाट, बाबाजी आग्रे, अथर्व गाढवे, शिवाजी आग्रे, निवृत्ती आग्रे, रवींद्र चौधरी, भानुदास चौधरी, विलास आग्रे, हनुमंत आग्रे, रवींद्र घोलप, रामदास राजदेव, संदेश आग्रे, सोन्या पानसरे, शांताबाई राजदेव, बाळू घोलप, अक्षय घोलप, किसन पानसरे, प्रकाश आग्रे, सुनील राजदेव, सोमनाथ चौधरी, विष्णू महाराज देशमाने, बारकु पानसरे सर, लक्ष्मण आग्रे सर, जयसिंग सिनारे, शहाजी काळे, सखाराम जेडगुले, स्वामी मेचे, बाबाजी माने, शैला आंधळे, कमल चिकने, मुरलीधर राजदेव, स्वप्निल राजदेव आदी मान्यवर उपस्थित होते..




