खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली निवड; दीपक अण्णा लंके यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान

पारनेर | प्रतिनिधी

श्रीकृष्ण हंगा-मुंगशी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाळकृष्ण दादाभाऊ साठे, तर व्हाईस चेअरमनपदी संतोष सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. खासदार लोकनेते निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडलेल्या निवड प्रक्रियेत दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.


निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन बाळकृष्ण दादाभाऊ साठे आणि व्हाईस चेअरमन संतोष सूर्यवंशी यांचा खासदार निलेश लंके यांचे ज्येष्ठ बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते दीपक अण्णा लंके यांच्या हस्ते यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करत सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभासद आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

या निवड कार्यक्रमाला शिक्षक नेते संतोष खामकर सर, सरपंच राजेंद्र शिंदे, संदीप शिंदे, भाऊ रासकर, नंदू सोंडकर, चंदन भाऊसाहेब, राजेंद्र दळवी, आबासाहेब दळवी, बापू महाराज दळवी, मोहनराव वाघुले, पांडुरंग रजपूत, सुदाम थोरात, पांडुरंग थोरात, भाऊसाहेब मोकाटे, गोरख मोकाटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे श्रीकृष्ण हंगा-मुंगशी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *