अहिल्यानगर, 
परीक्षेतून गुणवत्ताधारक शिक्षकांची होणार नियुक्ती जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत एकूण 246 केंद्र असून प्रत्येक केंद्रासाठी एक केंद्रप्रमुख असतो. यांपैकी 123 केंद्रप्रमुख सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीने भरले जातात. मात्र उर्वरित 123 केंद्रप्रमुखांच्या जागा शिक्षकांमधून विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे घेण्याचे धोरण २०१४ मध्ये निश्चित करण्यात आलेले होते. मात्र वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे अद्यापपर्यंत ही सर्व पदे रिक्त राहिलेली होती.

अलीकडेच ३ फेब्रुवारी २०२६ रोजी या पदभरतीसाठी शिक्षकांची ऑनलाइन परीक्षा पार पडली होती. त्यातील गुणवत्तेनुसार ही प्रक्रिया राबवण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव यांनी गुरुवारी शासन परिपत्रक जारी केले आलेले असून येत्या ११ दिवसांत नियुक्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार शुक्रवार पर्यंत गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणार असून त्यानंतर 5 दिवसांत 123 जागांसाठी 308 उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील 2 दिवसांत पात्र 123 उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येऊन त्यापुढील 2 दिवसांत समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्याचे आदेश या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. या भरतीसाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी प्राधान्याने हा विषय घेऊन यासाठी पुढाकार घेतला होता. या प्रक्रियेसाठी केंद्रप्रमुख परीक्षा कोअर टीमचे प्रमुख राजेंद्र खैरनार यांच्यासह सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.

विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेतून गुणवत्ताधारक तरुण शिक्षकांची केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती होणार असल्याने मागील अनुभवासह ज्ञानाचा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला निश्चितच लाभहोईल. जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कार्यक्षमता, शिक्षकांमध्ये प्रेरणा आणि शैक्षणिक समन्वय यांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, अशी खात्री आहे.

– श्री.नाना गाढवे, उमेदवार
(माजी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अहिल्यानगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *