पारनेर / भगवान गायकवाड,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत या देशव्यापी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी सर यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत विशेष सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या मेळाव्यास जामखेड तालुक्यातील भागातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष औटी सरांनी ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व कर्तव्य याचे महत्त्व सांगितले. ही चळवळ लोकजागृती आणि ग्राहक हक्क यासाठी व्यापक स्वरूपात काम करणारी चळवळ आहे. १९७४ पासून ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्यामुळेच ग्राहक संरक्षण कायदे निर्माण झाले आहेत. मात्र या कायद्याची समाजातील सर्व घटकांना ओळख करून देण्यासाठी मोठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. असे प्रतिपादन औटी यांनी केले.
या मेळाव्यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत जामखेड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जामखेड तालुकाध्यक्षपदी शिवाजी राळेभात यांची सन्मानपूर्वक निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष औटी यांनी त्यांना निवडीचे पञ देऊन सन्मानित केले. इतर पदाधिकारीही यावेळी निवडण्यात आले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जामखेड तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
तालुकाध्यक्ष शिवाजी राळेभात,
उपाध्यक्ष सागर फुंदे,
उपाध्यक्ष तुकाराम घोगरदरे,
सचिव कैलास नागला उर्फ शर्माजी,
सहसचिव नासिर चाचू सय्यद,
सहसचिव सुधीर सागडे,
कोषाध्यक्ष अविनाश नवगिरे,
व इतर सदस्य युवराज खेत्रे आणि विनोद बहिर यांची निवड झाली.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत महिला अध्यक्ष अमिता कोहली, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभाऊ चौधरी व पारनेर तालुका सचिव औटी साहेब उपस्थित होते. यावेळी जामखेड तालुका पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन श्री हरिभाऊ चौधरी ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जामखेड तालुक्यातील ग्राहक संरक्षणासाठी काम करण्यासाठी तरुणांनी संघटनेचे सभासद होऊन व्यापक लोकहीतासाठी कार्यरत व्हावे असे आवाहन नवनियुक्त तालुकाध्यक्ष शिवाजी राळेभात यांनी केले.




