सावरगांव / प्रतिनिधी,

        राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व सावरगांवचे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र गायखे यांनी आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटाने नव्हे, तर समाजहिताची जाण ठेऊन अत्यंत साधेपणाने आणि सेवाभावी पद्धतीने साजरा केला.
           गायखे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त स्वप्नवेध अनाथ आश्रम, मंगरूळ येथे अनाथ बालकांमध्ये खाऊ व शालेय साहित्याचे वाटप, तसेच जिल्हा परिषद शाळा, काळेवाडी येथे विद्यार्थ्यांमध्ये उपयोगी वस्तूंचे वितरण करून एक सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श ठेवला.
        या वेळी खासदार लोकनेते नीलेश लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, बाजार समिती संचालक दीपक पवार, उद्योजक संतोष गायखे, सरपंच अरुण पवार, पत्रकार शरद झावरे, नवनाथ गांजे, बाळासाहेब सिरतार, सचिन गोडसे, निलेश चिकणे, मनोज शिंदे, व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. सावरगांव ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने देखील गायखे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
           सामान्य माणसाच्या संघर्षातून पुढे आलेले, समाजासाठी नेहमी तत्पर असलेले आणि राजकारणात पारदर्शकता ठेवून कार्य करणारे रविंद्र गायखे यांचे कार्य गावासाठी प्रेरणादायी आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त सावरगांव ग्रामस्थांकडून, सहकाऱ्यांकडून व मित्रपरिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

१५ वर्षांचा सेवाभावी कार्यप्रवास

१९८४ मध्ये काळेवाडी येथे जन्मलेले रविंद्र गायखे यांनी केवळ ग्रामपंचायत सदस्य म्हणूनच नव्हे, तर एक लोकाभिमुख नेता म्हणून सावरगांवच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. २०१० पासून सलग तीन टर्म त्यांनी सदस्य म्हणून जनतेच्या सेवेसाठी काम केले आहे.खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली काळेवाडी, लांडगेवाडी, गोडसेवाडी, मानेवाडी यांसह गावठाणात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना गती मिळाली. यात रस्ते, सभामंडप, पाणंद रस्ते, शाळा खोली, हनुमान मंदिर सभामंडप यांचा समावेश आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

समाजसेवेचा वसा आणि भविष्यातील दृष्टिकोन

शैक्षणिक साहित्य, सायकली वाटप, महिलांना कार्ला दर्शन यात्रा असे अनेक सामाजिक उपक्रम रविंद्र गायखे यांनी स्वखर्चाने राबवले आहेत. ते फक्त राजकीय प्रतिनिधी नाहीत, तर समाजमन समजून घेणारे खरे कार्यकर्ते आहेत. नवनाथ गांजे पाटील यांच्या मते, “रविंद्र गायखे हे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक असून भविष्यात सरपंच झाले, तर सावरगांवचे नाव राज्यपातळीवर नेतील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *