लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसला करिष्मा

पारनेर/ विशेष प्रतिनिधी..
पारनेर तालुक्यातील कुरूंद गावात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले राजेंद्र उबाळे यांनी स्वकर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करत समाजातील दीन-दलित आणि गरीब घटकांसाठी अविरत कार्य केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) पारनेर तालुका अध्यक्ष म्हणून ते गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.

पारनेर तालुक्यामध्ये महायुती पक्षातील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे 2024 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजेंद्र उबाळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माजी खासदार सुजय विखे व आमदार काशिनाथ दाते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे व भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, निघोज गटाचे नेते सचिन पाटील वराळ, युवा नेते नितीन शेळके, यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. तालुक्यात संघटनात्मक पातळीवर काम करत असताना त्यांनी महायुतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने चांगले काम उभे केले आहे. 


विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने आणि मोर्चांमध्ये सहभाग घेतला असून, समाजातील अनेक समस्या सोडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.


RPI च्या माध्यमातून उबाळे यांनी पारनेर तालुक्यात पक्षसंघटना मजबूत केली आहे. गाव तिथे शाखा स्थापन करत त्यांनी पक्षाचा विस्तार केला असून, युवकांचे मोठे संघटन त्यांच्या पाठीशी आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी त्यांचा थेट संपर्क आहे. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली उबाळे विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्याची रामदास आठवले यांनी वेळोवेळी प्रशंसा केली आहे.


उबाळे यांनी युवा अध्यक्ष म्हणूनही पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ग्रामीण भागात RPI ची ताकद वाढली आहे. सामाजिक न्याय आणि समता यासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे. समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या या कार्यामुळे पारनेर तालुक्यातील जनतेत त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे.
उबाळे यांचे कार्य हा केवळ राजकीय यशाचा भाग नसून, समाजसेवेचा एक नवा आदर्श आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यातील सामाजिक चळवळींना नवी दिशा मिळाली आहे. 

तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे यांनी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळे तालुक्यातील अनेक युवकांना एमआयडीसीत रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी घरकुल योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला हक्काचे निवास मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे, घरकुल बांधकामासाठी मोफत वाळू मिळावी, यासाठी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.


उबाळे यांनी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. वृक्षरोपण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यांसारख्या उपक्रमांमुळे त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवले. तालुक्यातील कोणत्याही अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच आक्रमकपणे आवाज उठवला आहे. अत्याचाराला बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका नेहमीच ठाम राहिली आहे.
त्यांच्या या कार्यशैलीमुळे विकासाला दिशा मिळत आहे. युवकांना प्रेरणा देणारे आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणारे राजेंद्र उबाळे यांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे. त्यांच्या कार्यामुळे तालुक्यातील जनता त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. भविष्यातही त्यांचे हे प्रयत्न तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.


🔶🔶🔶🔶🔶🔶
लोकसभा विधानसभा निवडणुकीत बजावली महत्त्वाची भूमिका..

रिपाइंचे पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे यांनी युवकांचे संघटन उभे करून तालुक्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली व महायुतीच्या घटक पक्ष म्हणून आपले चोख काम करून दाखवले आहे. 



🔶🔶🔶🔶🔶🔶
आक्रमक ताकद असलेलं युवा नेतृत्व

पारनेर तालुक्यात रिपाइं पक्षाच्या माध्यमातून महायुतीला खऱ्या अर्थाने राजेंद्र उबाळे हे एक आक्रमक ताकद असलेले युवा नेतृत्व मिळाले आहे. माजी खासदार सुजय विखे, पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते यांच्या असलेला त्यांचा थेट संपर्क तसेच पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांच्या सोबत असलेला संपर्क हा भविष्यात तालुक्यातील विकास कामांसाठी कामी येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *