पारनेर / भगवान गायकवाड, 
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि त्यांना खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका क्रांतिदूत फातिमा शेख यांची संयुक्त जयंती शनिवार, दि. ३ रोजी पारनेर मध्ये साजरी केली जाणार आहे. दुपारी ३ वाजता ‘आनंद लॉन्स’ येथे हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती ‘सावित्री-फातिमा सदभावना मंच’चे कार्याध्यक्ष डॉ. रफिक सय्यद यांनी दिली आहे.

     आजच्या आधुनिक काळात स्त्रिया राष्ट्रपती, प्रधानमंत्री, जिल्हाधिकारी ते शास्त्रज्ञांपर्यंत सर्वच उच्च पदांवर कार्यरत आहेत. हे यश सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतलेल्या अपार कष्टांचे फळ आहे.

 सावित्रीमाईंनी जेव्हा शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचे कार्य सुरू केले, तेव्हा त्यांना फातिमा शेख यांची मोलाची साथ लाभली. इतिहासातील या दोन महान स्त्री शक्तींच्या ऋणांची जाणीव करून देण्यासाठी आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी या संयुक्त जयंतीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजाच्या विविध क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या महिला मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. डॉ. विद्या कावरे (नगराध्यक्षा, पारनेर नगरपंचायत),  शगुप्ता शेख,ॲड. सुनीता शिंदे, ॲड. सविता नगरे, ॲड. मोनिका सोनवणे, सरस्वती जावळे,प्रिती कांबळे या मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि फातिमा शेख यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येईल.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘सदभावना मंच’चे अध्यक्ष किसनराव पावडे, ह.भ.प. सोपानकाका औटी, प्रा.रभाजी औटी, भाऊसाहेब औटी,शाहूराव औटी ( सर), संभाजी औटी, शैलेंद्र औटी, डॉ.सादिक राजे,मारुती शेरकर(सर), भिकाजी जगदाळे( सर)पत्रकार लतिफ राजे, राजु करंदीकर आणि हमजेखा मोमीन , गोपी गाडगे,यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी टीम कार्यरत आहे.तसेच भास्कर औटी, डॉ. मुद्दतसर सय्यद, सलीम राजे, राजूभाई शेख, रमिज राजे, वसीम राजे, अविनाश देशमुख, संपत पवार, किरण सोनवणे आणि पत्रकार भगवान गायकवाड हे देखील या सोहळ्याच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते, त्या काळात सावित्रीमाई आणि फातिमा शेख यांनी संघर्षातून शिक्षणाची द्वारे उघडली. त्यांच्या बलिदानाची आणि कार्याची ओळख तरुण पिढीला होणे आवश्यक आहे,” असे मत डॉ. रफिक सय्यद यांनी व्यक्त केले आहे.

या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळ्याला पारनेर परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावित्री-फातिमा सद्भावना मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *