पारनेर / ता. प्रतिनिधी  

बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२६ पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघातील दैठणे गुंजाळ ता. पारनेर आणि हिवरे बाजार ता. नगर परिसरात संकरित गायींमध्ये अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गायी अचानक एक-दोन दिवसांत आजारी पडून दगावत असल्याने पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार काशिनाथ दाते सर यांनी तातडीने राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र देवून त्वरित उपाययोजनांची मागणी केली आहे.

जिल्हास्तरीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासण्या केल्या असल्या तरी आजाराचे निश्चित निदान अद्याप झालेले नाही. त्यामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढत असून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. पशुधन हेच उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.


शेतकऱ्यांच्या पशुधनाचे रक्षण व त्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी आमदार काशिनाथ दाते सरांनी घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरत असून प्रभावित भागातील ग्रामस्थांनी त्यांच्या हस्तक्षेपाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी राज्यस्तरीय तज्ञ पशुवैद्यकीय पथक तातडीने पाठवून आजाराचे निदान करावे, विशेष आरोग्य शिबिरे व लसीकरण मोहीम राबवावी, दगावलेल्या जनावरांचे पंचनामे करून “खास बाब” म्हणून आर्थिक मदत जाहीर करावी तसेच भविष्यातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, 
–  आ. काशिनाथ दाते सर 
(विधानसभा सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *