पारनेर / प्रतिनिधी, 
पारनेर शहरातील ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे गरीब आणि गरजू रुग्णांसाठी  रविवार, दिनांक २० जुलै रोजी सकाळी ९ वाजता मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असून, रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळणार आहेत.

यामध्ये कान, नाक, घसा संबंधित आजार, टॉन्सिल, नाकाचे हाड वाढणे, नाकाचे हाड फ्रॅक्चर, तसेच कान-नाक-घशाचे विविध आजार, मूळव्याध, भगंदर, गुदद्वाराचे आजार, पित्ताशयाचे आजार, वेरिकोन व्हेन्स, आणि अंगावरील गाठी अशा विवीध आजारांवरील मोफत तपासणी केली जाणार आहे.

या तपसणी साठी डॉ. विवेक चौधरी (MS, ENT), डॉ. केशरवाणी (MS, General Surgery) हे तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत.

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी रविवारी सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे आणि गरजू रुग्णांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ.श्रीकांत पठारे आणि डॉ. पद्मजा पठारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *