पारनेर / प्रतिनिधी 
  संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे एका शिक्षण संस्थे तर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी तेथे इंदापूरच्या शिवधर्म फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळे फासले होते आणि भ्याड हल्ला करणाऱ्यांवर मोक्का लावण्यात यावा व जन सुरक्षा विधेयक २०२४ कायदेसंदर्भात निवेदन पारनेर पुरोगामी संघटना कडून देण्यात आले. त्या बाबतचे निवेदन पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आले.
      या निवेदनावर सचीन नगरे ( संविधान व लोकशाही जागर समिती) किरण सोनवणे ( तालुकाध्यक्ष, आर पी आय ( निकाळजे गट), अमित जाधव ( संचालक, खादी ग्रामोद्योग, पारनेर), संजय सोनवणे ( तालुकाध्यक्ष, भीम आर्मी), संपत पवार ( तालुकाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), प्रल्हाद शिंदे (जिल्हाध्यक्ष, भीमशक्ती), ॲड. बाळासाहेब सोनवणे, ॲड. सोमनाथ गोपाळे, ॲड. गणेश कावरे, ॲड. मोनिका सोनवणे, ॲड. मयुरी जाधव, अविनाश देशमुख, प्रदीप मोरे, ईश्वर भोसले, सीताराम लवांडे, वसंत कसबे, अशोक जाधव, प्रकाश उघडे, रमेश बोरुडे, दादू जाधव, रामकृष्ण पवार, सिद्धात पवार, दीपक साळवे, व पुरोगामी चळवळीतील संघटनाचे सर्व सदस्य यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *