वासुंदे येथे जोगेश्वरी पतसंस्थेचा नवीन इमारत स्थलांतर सोहळा संपन्न


वासुंदे/प्रतिनिधी : 
तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षाचा अनुभव पाहता पतसंस्थांच्या शाखा वाढविण्याचा व नवीन संस्था काढण्याचा कोणी मनात विचार देखील आणणार नाही अशी परिस्थिती आहे ती का आली कशी आली त्याच्या खोलात मला जायचे नाही मी खोलात गेलो तर कदाचित या संस्था चळवळीच्या विरोधात जी काही शक्ती आहे त्या शक्तीला मिरच्या झोंबल्या जातील म्हणून मी त्यावर फार बोलणार नाही असे परखड मत पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले. 
वासुंदे येथे जोगेश्वरी पतसंस्थेच्या नवीन इमारतीमधील स्थलांतरण कार्यक्रम मध्ये आमदार दाते बोलत होते. ते पुढे म्हणाले परंतु राजकारणा पायी सहकारी संस्थांमध्ये राजकारण घुसून सहकारी संस्था पतसंस्था धोक्यात येत असतील तर ती गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी चांगली नाही पण ते घडलं आता बऱ्यापैकी सर्व शांत झालेलं आहे. 

यावेळी कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, व्हा. चेअरमन अशोक खराबी, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, सरपंच विमल झावरे, सरपंच प्रकाश राठोड, उपसरपंच शंकर बर्वे, उद्योजक संजय साळुंके, उपसरपंच रामभाऊ तराळ, मा. उपसरपंच परशुराम शेलार, निजाम पटेल, बापुसाहेब गायखे, अमोल उगले, पो. मा. झावरे, चेअरमन नारायण झावरे, दिलीप पाटोळे, गजानन झावरे, लक्ष्मण झावरे, संतोष शेलार, दत्तात्रय साळुंके, रामकिसन टेकुडे, सचिन सैद, संतोष कारंडे, अरविंद वाबळे, भाऊसाहेब हिंगडे, संतोष बागुल, सोन्याबापू बर्वे, छाया वाबळे, रेशमा राजे, कृष्णाराव वाबळे, अतुल दाते, नानासाहेब ढेंबरे, महेश झावरे, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी वासुंदे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम दाते यांनी केले. 

सहकार खात्यातच मोठी कीड…

पारनेर तालुक्यात पतसंस्था चळवळ मोठी आहे यापुढील काळात पतसंस्था चालवताना पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे पतसंस्थांमध्ये कीड ही विरोधकांची किंवा त्यामध्ये राजकारण करणाऱ्यांची नाही तर सहकार खात जे आहे त्या सहकार खात्याची पण फार मोठी कीड आहे खात्यातले अधिकारी व कर्मचारी सुद्धा पतसंस्थांकडे वेगळ्या दृष्टीने पाहून संस्थांना त्रास देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतात आणि त्याचा देखील दुष्परिणाम संस्थांवर होतो. असे मत आमदार काशिनाथ दाते यांनी सहकार खात्यातील अधिकाऱ्यांना सुद्धा दोष देत परखडपणे मांडले.

सहकार क्षेत्रात पतसंस्था चळवळ हा सामाजिक उपक्रम आहे सर्वसामान्य लोकांना व्यवहार करण्यासाठी पतसंस्था या साध्या आणि सुलभ असतात त्यामुळे वासुंदे येथील जोगेश्वरी पतसंस्थेचा सर्वसामान्यांना आर्थिक व्यवहार करताना फायदा होत आहे. जालिंदर वाबळे हे चांगला उपक्रम राबवत आहेत. 
 डॉ. विकासानंद महाराज मिसाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *