वडगाव सावताळ येथे 270 कुटुंबांना गॅस अनुदान वाटप
वडगाव सावताळ/प्रतिनिधी :
विखे कुटुंबाच्या माध्यमातून पारनेर तालुक्याचा सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून, सर्वसामान्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले गेले आहे, असे मत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे यांनी व्यक्त केले. वडगाव सावताळ येथे शासकीय योजनेंतर्गत सर्वसामान्य कुटुंबांना गॅस अनुदान वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या उपक्रमात आतापर्यंत 270 कुटुंबांना गॅस अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे.वडगाव सावताळ हे आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असलेले गाव आहे. या समाजाच्या विकासासाठी शिवाजी रोकडे यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. गॅस अनुदान वाटपाच्या या कार्यक्रमात गावातील अनेक कुटुंबांना लाभ मिळाला असून, यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शासकीय योजनांचा लाभ थेट गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विखे कुटुंबाने नेहमीच प्रयत्न केले असल्याचे रोकडे यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला भाऊसाहेब खामकर, कर्ण रोकडे, तुकाराम रोकडे, बापू शिंदे, संदीप व्यवहारे, शिवराम मोहिते, ज्ञानदेव रोकडे, अर्जुन साळुंके, किसन साळुंके, योगेश शिंदे, दत्तात्रय शिंदे, सखाराम भोबाळ, बाळासाहेब भनगडे, सुदाम व्यवहारे, दीपक रोकडे, गणेश खंडागळे, सतीश गायकवाड, अनिल गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमाने गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विखे कुटुंबाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा होत आहे.या कार्यक्रमाद्वारे शासकीय योजनांचा लाभ थेट गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. यापुढेही अशा उपक्रमांमुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
निवडणुकीत ताकद दाखवणार…
आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये भाजपची तालुक्यात ताकद दाखवून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी ढोकेश्वर गणातून शिवाजी रोकडे हे इच्छुक उमेदवार आहेत.




