महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व डिजिटल मीडिया अहिल्यानगर यांच्यातर्फे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन.

पारनेर/ प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष आणि दैनिक जनप्रवासचे संपादक सिद्धार्थ भोकरे यांना अज्ञात इसमाने निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सिद्धार्थ भोकरे यांनी १५ मे २०२५ रोजी एक लेख लिहिला, ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानी अभिनेत्यांचे भारतासंबंधी असलेले सन्मान आणि अभिमान लक्षात घेतला. त्यात त्यांनी भारतीय अभिनेत्यांना आपल्या देशाबद्दल अभिमान व्यक्त करण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यांचे मत हे स्पष्ट होते की, भारतीय अभिनेत्यांनी पाकिस्तानच्या निषेधात उभे राहावे आणि भारताचा गौरव वाढवावा.

भोकरे यांच्या या स्पष्ट मतावर आधारित एका अज्ञात इसमाने त्यांना धमकीचे पत्र पाठवले. या पत्रात भोकरे यांना धमकावले गेले की, “तुम्ही खान बंधूंची माफी मागितली नाही तर तुम्हाला उडवून टाकले जाईल.”

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने याच्या विरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस, डॉ. विश्वासराव आरोटे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, सिद्धार्थ भोकरे यांना तातडीने सुरक्षा पुरवली जावी. त्यांचा स्पष्ट इशारा होता की, जर आरोपींना तातडीने अटक केली नाही, तर राज्यभर या घटनेचा त्रिव निषेध व्यक्त करणारे आंदोलन छेडले जाईल.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पारनेर तालुक्याच्या वतीने या घटनेचा तीव्र स्वरुपात निषेध करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव अरोटे व अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ताजी पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना सर्व पत्रकारांनी एकत्र येत झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठी लेखी निवेदन दिले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्यानगर डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोदजी गायकवाड, पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, सचिव लतिफ राजे, पारनेर शहराध्यक्ष भगवान गायकवाड, निघोज शहर अध्यक्ष आनंदा भुकन, पत्रकार राम तांबे, पत्रकार जय हरेल आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

“भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असताना, ही घटना भारतीय पत्रकारिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंगाने एक मोठा धक्का ठरली आहे.” महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. “पत्रकारांचे काम म्हणजे लोकांचे विचार मांडणे आणि सत्य बोलणे यावर पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. – विनोद गायकवाड 
डिजीटल मीडिया जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अहिल्यानगर.
🙏🙏🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *