पारनेर/प्रतिनिधी : 
नांदूर पठार (ता. पारनेर) येथे माजी उपसरपंच रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून आणि निलेश लंके प्रतिष्ठान व ग्रामपंचायत नांदूर पठार यांच्या संयुक्त विद्यमाने रेशनिंग कार्ड दुरुस्ती, नवीन रेशनिंग कार्ड, नाव कमी करणे, आधार कार्ड अपडेट आणि बांधकाम कामगार कार्ड यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पचे उद्घाटन नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक अण्णा लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.कॅम्पला नांदूर पठारचे माजी उपसरपंच व निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव, माजी सरपंच भानुदास आग्रे, जयराम चौधरी, रामभाऊ चौधरी, लखन ठाणगे, पांडा जेडगुले, योगेश जाधव, अमोल चौधरी, नामदेव आग्रे, नवनाथ बुवा घोलप, बाळू घोलप, प्रियांका घोलप, शितल वाडेकर, अर्चना पानसरे, अर्चना चौधरी, अमोल गाडगे, संदेश आग्रे, रवी घोलप, सुरेश राजदेव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या कॅम्पच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना महत्त्वाच्या सुविधांचा लाभ मिळाला.यावेळी १ जून रोजी गावातील मान्यवर शंकर आग्रे, जनार्दन चौधरी, लक्षण मेचे, खंडू देशमाने, बाळशीराम घोलप, बाळू आहेर, भानुदास घोलप, गणेश देशमाने, मेजर कुंडलिक आग्रे, पारुबाई घनदाट, बाबाजी चौधरी, बालम हवालदार, बाळू चौधरी, गेणू आग्रे, राधाबाई घोलप यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन रविंद्र राजदेव मित्र मंडळ आणि निलेश लंके प्रतिष्ठान यांनी यशस्वीपणे केले.हा कॅम्प ग्रामस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून, रेशनिंग आणि आधार कार्डशी संबंधित समस्यांचे निराकरण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रविंद्र राजदेव यांच्या सामाजिक कार्याला ग्रामस्थांनी दाद दिली. अशा उपक्रमांमुळे गावातील प्रशासकीय सुविधा अधिक सुलभ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *