फटाक्यांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष
पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील मौजे अळकुटी येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन शाखेचे उद्घाटन रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले.
वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या हस्ते या शाखेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेली फटाक्यांची आतिषबाजी आणि दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.या उद्घाटन प्रसंगी पक्षाचे जिल्हा संघटक सुधीर ठोंबरे, युवा नेते योगेश क्षीरसागर आणि प्रतीक ठोकळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष योगेश साठे होते. पारनेर तालुक्यातील पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही शाखा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.यावेळी विचार पिठावर तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, विजय साळवे, महासचिव रवींद्र साळवे, किरण शिंदे, राहुल घंगाळे, पारनेर तालुका संघटक राहुल भालेराव, आणि शाखाप्रमुख संदीप जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.अळकुटी शाखेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला सुखदेव थोरात, मल्हारी सातपुते, सुरेश सातपुते, प्रकाश भालेराव, डॉ. भालेराव, शिवकांत शिंदे, राजू शेठ गायकवाड, मनोज सूर्यवंशी, माही सूर्यवंशी आणि संतोष गायकवाड यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
नवियुक्त अळकुटी शाखा अध्यक्ष गणपत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी भैय्यासाहेब आढाव, विठ्ठल शिंदे, हरीश आढाव, रामभाऊ शिंदे, सचिन शिंदे, बाळासाहेब शिंदे, प्रणव भालेराव, अमृत शिंदे यांच्यासह अळकुटी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्घाटनानंतर बोलताना जिल्हाध्यक्ष योगेश साठे म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडी हा सर्वसामान्य, कष्टकरी आणि उपेक्षितांचा आवाज आहे. अळकुटी येथील ही शाखा केवळ फलक नसून, गावातील प्रत्येक गरजू व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे एक केंद्र असेल. आगामी काळात पारनेर तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”कार्यक्रमाच्या शेवटी फटाक्यांच्या आवाजात आणि “जय भीम” च्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता. आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या शाखेच्या स्थापनेमुळे अळकुटी परिसरात वंचित बहुजन आघाडीचे बळ वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.





