पारनेर / भगवान गायकवाड, 

      हेड नगरविकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कामाची अंदाजे रक्कम ५० लक्ष रुपये खर्चित असलेल्या जामगाव रस्ता ते शेटे वस्ती व ठुबे वस्ती(शनि मळा)रस्ता कॅांक्रिटीकरण करणाचे काम रविवार दि.२७ रोजी पारनेर नगर पंचायतचे पदाधिकारी व प्रभागातील नागरिक यांनी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ नारळ वाढवून करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ. सचिन औटी, विजय औटी, नगरसेवक भूषण शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बंडू गायकवाड, रमीज राजे, सहदेव तराळ, बाळासाहेब देशमाने, बाळासाहेब शेटे, राहुल शेटे, बाबासाहेब ठुबे, रोहिदास शेरकर, दगडू शेरकर, अशोक गायकवाड, दादा शेरकर, अर्जुन बढे, विजय तराळ, अर्जुन बढे, नामदेव औटी, विलास ठुबे, अतुल शेटे, नितीन औटी, हनुमंत शेटे, निलेश तराळ, विकास शेरकर, दिपक शेटे, वसंत ठूबे, राहुल तराळ, सुनील तराळ, आकाश ठुबे, तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
          ग्रामपंचायत स्थापनेपासून येथील नागरिकांची रस्त्त्याची मागणी होती.परंतु आश्वासन सोडून आतापर्यंत काही पदरात पडत नव्हते.हा रस्ता इतका खराब होता की,पावसाळ्यामध्ये दोन चाकी,चार चाकी तर सोडा परंतु पायी चालणे देखील मुश्किल होते,नागरिक अक्षरश: हातात आपल्या चप्पल घेऊन रस्त्याने ये जा करत होते.
हा रस्ता अत्यंत अडचणींचा होता .कारण स्थानिक देखील अडचणी होत्या. परंतु सर्व स्थानिकांच्या सहकार्याने हा रस्ता आता पूर्ण होईल.

  नगरपंचायतला अपक्ष विजयी झाल्यानंतर अपक्ष नगरसेवक योगेश मते यांनी खा.निलेशजी लंके पॅनलला पाठिंबा ज्या वेळी दिला त्या वेळी मी कुठल्याही पदाची मागणी न करता प्रभागातील चार रस्ते करण्याची मागणी केली होती.त्याप्रमाणे निलेशजी लंके देखील दिलेला शब्द पाळला व या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला म्हणून हा रस्ता आता पुर्णत्वाकडे चालला आहे.
      

🔶🔶🔶🔶🔶🔶
या पुढील काळात देखील खासदार निलेशजी लंके यांचे मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष,उपनगराध्यक्षा,तसेच सर्व नगरसेवकाच्या सहकार्याने प्रभाग तसेच पारनेर शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू.प्रभागात काही विकास कामांची मागणी तसेच गरज हि स्वातंत्र्यापासून होती जी आजपर्यंत कुठल्याही पदाधिकार्यांनी पुर्ण केली नाही ती विकास कामे खासदार निलेशजी लंके साहेब तसेच सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने पूर्ण करु शकलो.त्यात लोणी रोड ते ठोंबरे वस्ती डांबरीकरण,महाजन मळा रस्ता डांबरीकरण,जामगाव रोड ते ओेॆटीवाडा कॅांक्रिटीकरण,जामगाव रोड ते ठुबे वस्ती कॅांक्रिटीकरण,तराळवाडी स्मशानभूमी करणे,भाऊ शेटे घर ते बाळू शेटे घर रस्ता कॅांक्रिटीकरण,सुभाष ओॆटी घर ते लोणी शिव रस्ता कॅांक्रिटीकरण करणे,पारनेर लोणी रस्ता कॅांक्रिटीकरण करणे तसेच संपुर्ण प्रभागात सिंगल फेज लाइटची व्यवस्था करणे.आदी विकासकामे प्रगतीपथावर आहेत. – योगेश मते, सभापती, पाणी पुरवठा विभाग
पारनेर नगर पंचायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *