पारनेर / भगवान गायकवाड,
पाडळी (ता पारनेर) 2 किलोमीटर हद्द ते देवदैठण (ता श्रीगोंदा ) 2 किलोमीटर असे दोन तालुक्यातील शिरूर येथे जाणार महत्वाचा व मुख्य रस्ता आहे. सदर रस्ता झेडपी अखत्यारीत आहे. हा रस्ता अरुंद असल्याने वहान चालकांना गाड्या चालवताना कसरत करावी लागते. परिणामी अपघात होतात. त्यामुळे सदर रस्ता रुंद होण्यासाठी व मोठा निधी उपलब्ध होऊन रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली होण्यासाठी सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग व्हावा यासाठी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मनोजभाऊ मुंगसे, पाडळी रांजणगाव सेवा सोसायटी मा.चेअरमन किरण साठे,मा.संचालक दीपक करंजुले यांनी पालकमंत्र्यांचीं भेट घेतली.
🔶🔶🔶🔶🔶🔶
अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न सुटत नव्हता मात्र पत्रकार दीपक करंजुले व पाडळी सोसायटी चेअरमन किरण साठे यांच्या पाठपुराव्यातून पालकमंत्री विखे साहेब हा प्रश्न सोडवतील असा विश्वास आहे.
– मनोजभाऊ मुंगसे (तालुकाध्यक्ष भाजप युवा मोर्चा.)




