पारनेर / ता. प्रतिनिधी  

शनिवार दि. ७ मार्च २०२६ निघोज गावातील ढवणवाडी येथील श्री चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त मढी येथून पवित्र ज्योत आणण्यासाठी निघालेल्या शेकडो भाविक कार्यकर्त्यांचा पारनेर शहरातील आमदार काशिनाथ दाते सर जनसंपर्क कार्यालयात सन्मान करण्यात आला.

पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार दाते सरांच्या वतीने उद्योजक मंगेश काशिनाथ दाते यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करून पुढील धार्मिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत यथोचित सन्मान केला. यावेळी उद्योजक राजेंद्र औटी, सुनिल गाडगे, कार्याध्यक्ष रमेश वरखडे, वसंत ढवन, मच्छिंद्र लाळगे, संकेत ढवण, वेदांत ढवण, सुदाम ढवण, शंकर ढवण, दिपक ढवण, संदीप ढवण, दिलीप वरखडे, गणेश ढवण, युवराज ढवण, निखील ढवण, शुभम ढवण, संतोष ढवण, अमोल एरंडे, विष्णु ढवण, विनायक ढवण, नवनाथ ढवण, सुनिल ढवण, संपत ढवण, आदिनाथ ढवण, शंकर ढवण, राजू ढवण, वसंत ढवण, किरण वरखडे, तुषार ढवण, सोमनाथ ढवण, तुषार घुले, आकाश चव्हाण, प्रविण कोठावळे, मंगेश ढवण, भास्कर ढवण, आकाश ढवण यांसह श्री चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट ढवनवाडीचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी मंगेश दाते म्हणाले, निघोज आणि धार्मिकतेचे एक अतूट नाते असून माता मळगंगेची पावन भूमी असलेल्या निघोज नगरीतील ढवनवाडीच्या चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रेला आणि या परंपरेला परिसरातील भाविकांमध्ये मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. वर्षानुवर्ष हि अनमोल धार्मिक परंपरा जपण्यासाठी कार्य करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आगामी काळातही या ट्रस्ट व मंडळाच्या सर्व उपक्रमांना आमदार काशिनाथ दाते सरांच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

निघोज येथील ढवणवाडीमध्ये आयोजित चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव धार्मिक वातावरणात साजरा होत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मढी येथे जाऊन ज्योत आणण्याच्या या पारंपरिक सोहळ्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमदार काशिनाथ दाते यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या स्वागतामुळे भाविकांचा उत्साह अधिक वाढल्याचे त्यांनी सांगितले. 

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयात आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा करण्यात आलेला सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी असून तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अशा प्रकारच्या पाठबळामुळे धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यास सर्व युवा सहकाऱ्यांना अधिक उत्साह मिळतो. तसेच आमदार दाते सर आणि उद्योजक मंगेश दाते यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांनी कृतज्ञता व्यक्त करतो.

– गणेश भास्कर ढवण 

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 धार्मिक परंपरा जपणाऱ्या अशा उपक्रमांना आमदार दाते सर नेहमीच प्रोत्साहन देत असतात. मढी येथून ज्योत आणण्यासाठी निघालेल्या ढवणवाडी – निघोज येथील भाविकांचा आमदार महोदयांच्या अनुपस्थितीतही करण्यात आलेला सन्मान हा जनतेशी असलेले आमदार दाते सरांचे नाते अधिक दृढ करणारा असून पुढील काळातही अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांना आमदार दाते सरांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असा विश्वास नेहमी वाटतो.
– रमेश वरखडे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पारनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *