महिला सक्षमीकरणासाठी काम करणार – सामाजिक कार्यकर्त्या सुनीता सोबले
पारनेर शहरातील सोबलेवाडी येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम
खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात जयश्री शेरकर यांना इलेक्ट्रिक स्कुटी
पारनेर/प्रतिनिधी :
ग्रामीण आणि दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारनेरमधील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘होम मिनिस्टर: खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. केवळ मनोरंजनच नव्हे, तर आगामी काळात महिलांच्या समस्या सोडवून त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रोत्साहनासाठी मी कटिबद्ध राहीन,” असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या व जय जिजाऊ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनीता सोबले यांनी व्यक्त केला.
पारनेर शहरातील सोबलेवाडी येथे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सुनीता सोबले यांच्या पुढाकाराने आणि ‘क्रांती नाना माळेगावकर’ यांच्या सादरीकरणाने या रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांच्या हस्ते व पारनेर नगरपंचायतीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या योगिता औटी, नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे, उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे, माजी उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, कान्हूर पठारच्या सरपंच संध्या ठुबे, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी यांच्यासह नीता ठुबे, प्रियंका औटी, गायत्री सोनवणे, अंकिता शेळके यांसारख्या अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यामध्ये जयश्री शेरकर यांनी प्रथम क्रमांकाची इलेक्ट्रिक स्कुटी जिंकली. अन्य विजेत्या महिला पुढीलप्रमाणे: संगीता सोबले(फ्रिज), पूजा शेरकर (शिलाई मशीन), अनिता शेरकर (सोन्याची नथ), जिजाबाई शेरकर (प्रेशर कुकर), रागिनी बुगे (पिठाची गिरणी), सविता थोरात व मनीषा थोरात (मोबाईल), तसेच राजश्री खताळ (एलईडी स्मार्ट टीव्ही), सुवर्णा सोबले (गॅस शेगडी), ताराबाई सोबले (टेबल फॅन) आणि सुनीता सोबले यांना चांदीचा छल्ला देऊन गौरविण्यात आले. उपस्थित प्रत्येक महिलेला सन्मानपूर्वक पैठणी भेट देण्यात आली.
🔶🔶🔶🔶🔶🔶
नियोजन आणि यश….
सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई सोबले यांनी पारनेर येथे आयोजित खेळ पैठणीचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमान तरुण मित्र मंडळ (सोबलेवाडी,पारनेर), सुनीताताई सोबले युवा मंच आणि जय जिजाऊ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. पारनेरमधील महिलांना दिलेली ही अनोखी भेट तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन….
सोबलेवाडी येथे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई सोबले यांच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित’दादा पवार यांच्या स्मृतींना कार्यक्रमात मान्यवर व पारनेर शहराच्या नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष व नगरसेविका यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले व त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.




