पारनेर / ता. प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेत सन २०२६–२७ च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेदरम्यान पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि लोकाभिमुख भूमिका मांडत शेतकरी, ग्रामीण भाग आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. सभागृहात बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींचा उल्लेख करत या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली असल्याचे नमूद केले.
शेतकरी प्रश्नांवर ठाम भूमिका……..
अर्थसंकल्पातील दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय स्वागतार्ह असुन नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अधिक प्रोत्साहनपर अनुदान दिले पाहिजे. सध्या कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याचे आ. दाते यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तंत्रज्ञानासोबतच शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी ठोस धोरण आवश्यक असायला हवे.
ग्रामीण विकासालाही समान प्राधान्य हवे शहरी भागात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात असताना ग्रामीण भागातील रस्ते, दळणवळण आणि मूलभूत सुविधांनाही तितकेच महत्त्व देणे गरजेचे असल्याने मुख्यमंत्री शेत पाणंद रस्ते योजना व रोजगार हमी योजनेतील पाणंद रस्त्यांची कामे एकत्रितपणे प्रभावीपणे राबविण्याचीही सूचना आ. दातेंनी केली.
सौर कृषी पंप व वीजपुरवठ्याचा प्रश्न…….
मतदारसंघात सौर कृषी पंपासाठी अर्ज करूनही अनेक शेतकरी दीर्घकाळ प्रतीक्षा करत असल्याने सौर ऊर्जा प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीने सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. तसेच ग्रामीण भागातील अपुरा वीजपुरवठाही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. पशुधन आजाराबाबत तातडीची उपाययोजना कराव्या,
हिवरे बाजार परिसरातील गावांमध्ये पशुधनावर अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणावर जनावरे मृत्युमुखी पडत असल्याची गंभीर बाब आहे. या आजाराचे तातडीने निदान करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने मदत करावी.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
उद्योग व रोजगाराच्या संधी उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राने घेतलेली आघाडी कौतुकास्पद असुन सुपा एमआयडीसीमध्ये सुरू झालेल्या उद्योगांमुळे रोजगाराच्या संधी वाढत आहे. उद्योग विकासामुळे ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल, तसेच दुष्काळी भागासाठी सिंचनाची गरज पारनेर मतदारसंघ हा प्रामुख्याने दुष्काळी भाग असल्याचे सांगत त्यांनी कुकडी व गोदावरी खोऱ्यातील पाणी लिफ्टद्वारे पठार भागात आणण्याच्या योजनांना गती देण्याची गरज, या योजनांचे सर्वेक्षण सुरू झाल्याने त्या लवकर पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा.
– आ. काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)




