पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील सुपा जुनी व सुपा फेज २ एमआयडीसी अंतर्गत निकृष्ट रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळया यादीत टाकावे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी त्यासाठी रविश रासकर व सहकाऱ्यांनी सोमवार दि. १८ रोजी कार्यालय नवनागापूर ऑफीस समोर सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
अधिकारी उपोषण कर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी येत होते.मात्र एमआयडीसी मधील रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळया यादीत टाकून दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण करते ठाम राहणार असे सांगितल्याने काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याकारणाने ठेकेदारावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे ठेकेदाराला काळया यादीत टाकून त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण सुरू होते. उपअभियंता औद्योगिक विभाग यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कामगार नेते रविश रासकर व सहकाऱ्यांनी लिंबू पाणी घेऊन हे उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणा दरम्यान कामगार नेते रविश रासकर यांच्यासोबत प्रवीण दळवी, तेजस गायकवाड, यश मिसाळ, दादा शेळके, नगरचे संकेत गुंजाळ व त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते.




