पारनेर / भगवान गायकवाड, 

समर्थ रामदास स्वामी संस्थापित जागृत दक्षिणमुखी हनुमंतरायाचा दरवर्षी आयोजित होणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व सप्ताहाची यंदा ४२ वी वर्षपूर्ती संपन्न झाली. याच सप्ताहाची सांगता आणि वि.का.सोसायटीचे चेअरमन मुकेशशेठ चंद्रकांत डेरे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावात सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला.

या अनुषंगाने गावात भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी,आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे आयोजन संजीवनी ब्लड बँक तसेच दत्ताभाऊ बन्सी येवले (ग्रा.सदस्य रेनवडी)यांच्या संयुक्त विद्यमाने झाले. रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून मानवतेचे ऋण फेडले, तर नेत्र तपासणी व आरोग्य तपासणीचा नागरिकांनी लाभ घेतला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. तसेच शाळेच्या परिसराच्या सुरक्षिततेसाठी मुकेशशेठ चंद्रकांत डेरे यांचे बंधू गणेशशेठ डेरे व परिवाराकडून आधुनिक सीसीटीव्ही संच भेट देण्यात आला. या भेट अर्पण सोहळ्याचे आयोजन मातोश्री भिमाबाई चंद्रकांत डेरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. डेरे परिवाराने वेळोवेळी सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रात दिलेले योगदान मोलाचे असून, त्यांच्या या परोपकारी वृत्तीमुळे गावातील विकास व ऐक्य वृद्धिंगत होत आहे.
या सर्व उपक्रमांचे श्रेय चेअरमन मुकेशशेठ डेरे यांच्या सामाजिक जाणिवा व धार्मिक परंपरांप्रती असलेल्या आदरभावना यांना दिले जात असून, या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ यांनी डेरे परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *